अरे बापरे: राज्यभरात ८ हजार २३२ पोलिसांना कोरोनाची बाधा

दिवसेंदिवस पोलिस दलातील परिस्थिती बिकट होत चालली असल्यानेच चालू आठवड्यात पोलिसांची ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ सुरू केली आहे.

अरे बापरे: राज्यभरात ८ हजार २३२ पोलिसांना कोरोनाची बाधा
SHARES

लॉकडाऊन तसेच कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी आरोग्य विभागासोबतच पोलिसही रात्रंदिवस कर्तव्य बजावित आहे. तर कोरोनाविरुद्ध् लढणा-या योद्ध्यांनाच संसर्गाने विळखा घातला असुन, राज्यात आतापर्यंत८ हजार २३२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात मुंबई पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यात ८६१ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असून आतापर्यंत ९३ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोविड-१९ने मृत्यू झालेला आहे. दिवसेंदिवस पोलिस दलातील परिस्थिती बिकट होत चालली असल्यानेच चालू आठवड्यात पोलिसांची ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन  टेस्ट’ सुरू केली आहे.

हेही वाचाः-Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’

महाराष्ट्र पोलिस दलात आज १८२५ कोरोनाचे अँक्टीवर रुग्ण आहेत. त्यात २१४ अधिकारी आणि १६११ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर ६ हजार ४०७ हे संक्रमित असून त्याच्यात कोरोनाचे प्रमाण हे अतिसौम्य आहे. त्यामुळे यांना क्वारन्टाइंन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यातील ६३१४ पोलिसांनी कोरोनावर मात केलेली आहे.  कोरोनामुळे आतापर्यत राज्यात ९३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांचे प्रमाणा सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. वेळीत या संसर्गाला आवरले नाही. तर परिस्थिती हाताबाहेर जाईल म्हणूनच मुंबई पोलिस दलात २४ जुलै ते २९ जुलै या कालावधीत मुंबई प्रादेशिकविभागातील परिमंडळानुसार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ची टेस्ट केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विभागीय सहाय्यक पोलिस आयुक्त यांची भूमिका ही संपर्क अधिकारी म्हणून महत्वाची राहणार आहे. वेळापत्रकानुसार विभागातील एकापोलिस ठाण्याच्या ठिकाणी हे शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात फक्त ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांची टेस्ट केली जाणार असून त्यात कुणी पाँझिटिव्ह आढळला. तर त्याला तातडीने पालिका किंवा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी किंवा क्वारनटाइंन सेंटरमध्ये हलवले जाणार आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची चाचणी करून घेण्याचे काम हे संबधित वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर सोपवण्यात आले आहे.

हेही वाचाः-'ही' आहे मुंबईतील सील केलेल्या इमारतींची यादी

मुंबई पोलिस दलात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन त्या मागे नेमके कोणते कारण आहे. त्याचा अभ्यास करून एक अहवाल बनवण्यात आला. या अहवालात ५० टक्के कोरोनाबाधित पोलिस हे कंटेन्मेंट झोन परिसरात कर्तव्याला अथवा त्यांचे कार्यालय त्या परिसरात होते. तर ४५ टक्के मृत पोलिस कन्टेन्मेट झोन अथवा आसपासच्या परिसरातील राहणारे होते. तर उर्वरित पोलिसांमध्ये आजार उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजारपणांची लक्षणे आढळून आली. या अहवालात सर्वाधिक म्हणजे ३३.२४ टक्के रुग्ण ३१ ते४० वर्ष वयोगटातील होते. म्हणजे मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत तीन पोलिसां मागे एक रुग्ण हा ३१ ते ४० वर्ष वयोगटातील आहे. त्याच्या पाठोपाठ सुमारे २८ टक्के रुग्ण हे २० ते ३० वर्ष वयोगटातील आहेत. ४० ते ५० वर्ष वयोगटातील बाधीत पोलिसांची संख्या २२टक्के आहे, तर ५० वर्षांवरील कोरोना बाधीत रुग्णांची प्रमाण १७ टक्के आहे. मुंबई पोलिस दलात ३१ ते ४० वर्ष वयोगटातील कोरोना बाधीत पोलिसांची संख्या सर्वाधीत असली तरी, ८२ टक्के मृत पोलिस ५० वर्षांवरील आहेत यातील ४५ ते ५५ वयोगटातील पोलिसांना धोका सर्वाधिक असल्याने हे ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’ शिबीर घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा