मालाडमध्ये अल्पवयीन चोरट्यांचा धुमाकूळ, लॉकडाऊनमध्ये चोरल्या २७ दुचाकी

हे दोघेही विशेषता अक्टीवा गाड्या चोरायचे, या दोघांकडून हस्तगत केलेल्या गाड्यांमध्ये १४ होडा अक्टीवा, ९ डीओ, २ एव्हिएटर, १ शाईन आणि १ युनिकाँरर्न कंपनीच्या अशा २७ गाड्या हस्तगत केलेल्या आहेत.

मालाडमध्ये अल्पवयीन चोरट्यांचा धुमाकूळ, लॉकडाऊनमध्ये चोरल्या २७  दुचाकी
SHARES

लॉकडाऊनमध्ये अनेक जण घरातच अडकून पडल्याने मोकळ्या रस्त्यांवर उभ्याअसलेल्या त्यांच्या दुचाकीकडे दोन महिनेतरी अनेकांनी दुर्लक्ष केले. नेमके याच संधीचा फायदा घेऊन मालाडमध्ये दोन चोरांनी दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला. एक-दोन नाही. या चोरट्यांनी परिसरातील तब्बल २७ दुचाकी चोरल्याची माहिती पुढे आली आहे. नुकतेच या दोघांना मालाड पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केल्यानंतर हीबाब पुढे आली आहे.

हेही वाचाः- 'ही' आहे मुंबईतील १७ जूनपर्यंतची कंटेन्मेंट झोन यादी

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून उत्तर मुंबई परिसरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आधीच लॉकडाऊनमुळे गस्तीवर २४ तास ड्युटी केल्यानंतरही नवी डोकेदुखी पोलिसांना झाली होती. या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना. एका खबऱ्याने मालाड पोलिस दलातील पोलिस नाईक तोंडवलकर आणि काटे यांना संबधित चोर हा मालवणी अंबुजवाडी परिसरातला असल्याचे सांगितले. त्यानुसार मालवणी परिसरातील अंबजुवाडी येथे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक बनसोडे, तोंडवलकर आणि काटे यांनी १५ जून रोजी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यावेळी पोलिसांनी एका चोराला चोरीची दुचाकी फिरवताना पकडले. त्याच्या चौकशीत त्याने मित्राच्या मदतीने गोरेगाव व बोरिवली परिसरात १६ दुचाकी चोरल्याची कबूली दिली.  पोलीसांनी त्याच्या मित्रालाही ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याजवळ पोलिसांना ११ दुचाकी मिळून आल्या आहेत.

हेही वाचाः- लोकलसाठी सहन करावा लगतोय 'हा' त्रास

ही दोन्ही मुले विधीसंघर्ष मुले असून या दोघांनी उत्तर मुंबईत अक्षरशा धुमाकुळ घातला होता. हे दोघेही विशेषता अक्टीवा गाड्या  चोरायचे,  या दोघांकडून हस्तगत केलेल्या गाड्यांमध्ये १४ होडा अक्टीवा, ९ डीओ, २ एव्हिएटर, १ शाईन आणि १ युनिकाँरर्न कंपनीच्या अशा २७ गाड्या हस्तगत केलेल्या आहेत. या दोघांनी या पूर्वी अशाप्रकारे चोऱ्या केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुशंगाने तपास सुरू असल्याचे मालाड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा