Advertisement

लोकलसाठी सहन करावा लगतोय 'हा' त्रास

लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागतं आहे.

लोकलसाठी सहन करावा लगतोय 'हा' त्रास
SHARES

लॉकडाऊनमुळं बंद असलेली लोकल सोमवारपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. परंतु, ही लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं सामनान्यांना प्रवासाची मुभा नाही. दरम्यान, एकीकडं लोकल सुरू झाली म्हणून अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागतं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच ओळखपत्र तपासणी आणि थर्मल स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकातही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रामुख्यानं हे केलं जात आहे. अशातच, तिकीट, नवा पास किंवा नूतनीकरणाकरिता बहुतांश स्थानकांवर मर्यादित खिडक्याच कार्यरत असल्यानं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास रांगेत तासन्तास उभे राहून करावा लागतो आहे.

सोमवारपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे उपनगरीय लोकल सेवेत दाखल झाली. मात्र, रेल्वे व राज्य सरकारकडून माहिती उपलब्ध करण्यास लागलेल्या विलंबामुळे सकाळी गर्दीच्या वेळी बहुतांश लोकल रिकाम्याच धावल्या. मंगळवारी मात्र सकाळपासून रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या तिकिटासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ वाजल्यापासून मध्य रेल्वेवरील ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली, कु र्ला, घाटकोपर, दादर याशिवाय पश्चिम रेल्वेवरील दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली यांसह अन्य काही स्थानकांत तिकिटाच्या रांगा लागल्याचे चित्र होतं.

काही स्थानकांत सकाळी गर्दीच्या वेळी २ तिकीट खिडक्या सुरू होत्या. प्रवाशांच्या रांगा पाहून तिकीट खिडकी सुरू केली जात होती. मात्र एकाच खिडकीवर कर्मचाऱ्याच्या ओळखपत्रावर नवीन पास, पासाचं नूतनीकरण आणि तिकीटही दिलं जात होतं. एकाच तिकीट खिडकीवर अनेक कामं होत असल्यानं रांगा वाढतच होत्या.



हेही वाचा -

पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा