Advertisement

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक

मुंबईतील बहुतांशी सर्वच पालिका वॉर्डात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत असे अनेक वॉर्ड आहेत जिथे रुग्णांची संख्या ही भारतातील अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे.

मुंबईतील 'या' वॉर्डांमधील कोरोना रूग्णांची संख्या अनेक राज्यांपेक्षा अधिक
SHARES

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पुढे गेली आहे, तर मुंबईतील हा आकडा 60 हजार आहे. मुंबईतील बहुतांशी सर्वच पालिका वॉर्डात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत असे अनेक वॉर्ड आहेत जिथे रुग्णांची संख्या ही भारतातील अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे.

14 जूनपर्यंत मुंबई महापालिकेच्या के पूर्व प्रभागात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 4076 आहे.  तर संपूर्ण पंजाबमध्ये कोरोनाचे 3267, उत्तराखंडमध्ये 1845, ओडिशामध्ये 4055, केरळमध्ये 2543 आणि छत्तीसगडमध्ये 1756  रुग्ण आहेत. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, जी उत्तर मधील कोरोना रूग्णांची संख्या 3834 आहे. तर संपूर्ण झारखंडमध्ये 1763, त्रिपुरामध्ये 1086, गोव्यात 592 आणि मणिपूरमध्ये 490 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

मुंबईतील बीएमसीच्या 24 प्रभागांपैकी 14 प्रभागांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या 2 हजारांच्या वर पोहोचली आहे. के पूर्व, जी उत्तर, एल, के पश्चिम, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण, एस, एन, एच, पी उत्तर, एम पूर्व मध्ये कोरोना रूग्णांची संख्या 2 हजारांच्या वर आहे. त्याच वेळी, बोरीवली (आर मध्ये) आणि कांदिवली (आर दक्षिण) मध्ये देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.



हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा