लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ५६ हजार गुन्हे दाखल

पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३०० घटना घडल्या. त्यात ८६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी १ लाख ५६ हजार गुन्हे दाखल
SHARES

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऐकीकडे प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत असताना. दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करत नागरिक बिनदिक्कत रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली. तर गाड्या घेऊन फिरणाऱ्यांच्या गाड्याचं जप्त केल्या, अत्यावश्यक सेवा वगळता कुणीही घराबाहेर पडू नये, तसेत घराबाहेर पडणार असाल तर ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगा. असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचाः- ठाणे महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते ८ जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख ५६ हजार २९९ गुन्हे नोंद झाले असून २९ हजार ७९३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ५ लाख ६९ हजार ४००  पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही बेशिस्त व्यक्ती पोलिसांवरच हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३०० घटना घडल्या. त्यात ८६३ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

पोलिसांकडे मदतीसाठी १ लाख ६ हजार फोन

 पोलीस विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०६,१०५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०१ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३५ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ८८,७८६ वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

     कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४२ पोलीस व २ अधिकारी अशा एकूण ४४, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३,नाशिक शहर १, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ४ व ठाणे ग्रामीण १ व १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर १, रायगड १,जालना SRPF १ अधिकारी , अमरावती शहर १ wpc,उस्मानाबाद १,नवी मुंबई  SRPF १ अधिकारी अशा ७१ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १२६ पोलीस अधिकारी व १०२७ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा