Advertisement

ठाणे महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’

ऑनलाइन बेड अलोकेशन सेवेसाठी महापालिका प्रशासनाने एक संकेतस्थळ तयार केले आहे.

ठाणे महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’
SHARES

ठाणे महापालिकेने ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’ सुरू केली आहे. या सेवेमुळे कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. तसंच या सेवेमुळे रुग्णवाहिका मिळवणंही सहज शक्य होणार आहे.

ऑनलाइन बेड अलोकेशन सेवेसाठी महापालिका प्रशासनाने एक संकेतस्थळ तयार केले आहे. महापालिकेने बनविलेल्या www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक उघडल्यानंतर रुग्णांना आवश्यक ती माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होते. या माहितीच्या आधारे रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड रुग्णालय यांपैकी कोठे दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जातो.

रुग्णाने रुग्णवाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती रुग्णवाहिका पथकाकडे पाठवली जाते. त्यानंतर  रुग्णाला सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रुग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येतो. रुग्ण रुग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारण्यात येतो. क्रमांक दिल्यानंतर रुग्णांस संबंधित रुग्णालयात दाखल केलं जातं.

नागरिकांचे कोरोनाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महापालिकतर्फे ‘कोविड कॉल सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे.

 त्यासाठीचे भ्रमणधवनी क्रमांक

८६५७९०६७९१

८६५७९०६७९२

८६५७९०६७९३

८६५७९०६७९४

८६५७९०६७९५

८६५७९०६७९६

८६५७९०६७९७

 ८६५७९०६७९८

८६५७९०६८०१

८६५७९०६८०२हेही वाचा - 

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा