Advertisement

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण

नवीन ४७१ रूग्णांमुळे कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १० हजार ३५१ झाली आहे.

कल्याण-डोंबिवलीत बुधवारी ४७१ नवे रुग्ण
SHARES

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे ४७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्येने आता १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी ७ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे.

नवीन ४७१ रूग्णांमुळे  कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १० हजार ३५१ झाली आहे. यामधील ४९४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५२४७ रुग्ण उपचार घेत आहेत. या ठिकाणी आतापर्यत १५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी सापडलेल्या नवीन रूग्णांमध्ये  कल्याण पूर्व ९६, कल्याण प. १३२, डोंबिवली पूर्व १४६, डोंबिवली प. ६०, मांडा टिटवाळा ९, मोहना २४  तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत ५०९ रुग्णांना डिस्चार्ज भेटल्याने ही बाब कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा देणारी आहे.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ८०६ नवे रुग्ण, ६४ जणांचा दिवसभरात मृत्यू

violating lockdown in Maharashtra नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १ लाख ५४ हजार जणांवर गुन्हे दाखल
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा