लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण घटले

गेल्या वर्षीच्या कौटुंबिक अत्याचाराच्या प्रमाणांत या वर्षी ८८ टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण घटले
SHARES

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत जरी असला. तरी देशाचा आर्थिक गाडा सुरळीत ठेवण्यासाठी लाॅकडाऊनमध्ये शिथीलता आणणे गरजेचे आहे. त्यामुळेच मिशन बिगिन अगेन अंतर्गत देशांत लॉकडाऊनचा सहावा टप्पा सुरु झाला असुन, त्यात अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा दिली आहे. कोरोनाच्या संकट काळातही एक समाधानाची बाब घडली आहे, ती म्हणजे या दरम्यान कौटुंबिक अत्याचाराचे प्रमाण घटल्याचे समोर आले आहे.

हेही वाचाः- मुंबई, पुण्यातल्या ५ हजार लोकांवर लवकरच कोरोना लसचं ट्रायल

देशात मागील काही वर्षांपासून कौटुंबिक कलहामुळे हिंसाचाराचे प्रमाण वाढले होते. मात्र गेल्या वर्षीच्या कौटुंबिक अत्याचाराच्या प्रमाणांत या वर्षी ८८ टक्के घट झाल्याचे समोर आले आहे.  लॉकडाउनमध्ये वर्क फ्रॉम होम असल्याने, दिवसभर कामानिमित्त बाहेर राहणारे पती-पत्नी सातत्याने एकमेकांसमोर असल्याने, त्याच्यातील सु-संवाद वाढत गेला. त्यामुळेच कदाचीत कौटुंबिक वाद कमी झाल्याचे मत  मानसोपचारतज्ञाने व्यक्त केले आहे. मात्र त्यातुनही काहीठिकाणी कलम ४९८ अंतर्गत केसेस दाखल झाल्या असुन, याचा अधिक तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी दाखल झालेल्या केसेस पुन्हा मागे घेण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.

हेही वाचाः- जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

गेल्या तीन महिन्याची आकडेवारी पाहता, जुन महिन्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या कलम ४९८ अंतर्गत १२ गुन्हे दाखळ झाले आहेत. तर मे महिन्यात ६ गुन्हे दाखल झाले आहेत. तर एप्रिल महिन्यात केवळ ४ गुन्हे दाखल झाले आहेत.  मात्र त्यातुनही अनेक प्रकरणांमध्ये सामंजस्याने गुन्हे मागे घेण्यासाठीही अर्ज करण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले. तर दुसरीकडे २०१९ मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना अधिक  होत्या.गेल्या वर्षी जुन महिन्यात कौटुंबिक अत्याचाराच्या कलम ४९८ अंतर्गत ७४  गुन्हे दाखल झाले होते. तर मे, २०१९  मध्ये ४९ गुन्हे तर एप्रिल २०१९ मध्ये ६२ गुन्हे दाखल झाले होते. तर यातील बरीच प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती एका पोलीस अधिका-याने दिली. तर इतर प्रकरणाचा अद्याप तपास सुरु आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा