Advertisement

महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारं राज्य बनवणार- मुख्यमंत्री

महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारं राज्य बनविण्याचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न मी पूर्ण करणारचं, असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारं राज्य बनवणार- मुख्यमंत्री
SHARES

कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात १३१ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वोच्च व  सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारं राज्य बनविण्याचं माझं स्वप्न आहे. हे स्वप्न मी पूर्ण करणारचं, असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. (maha vikas aghadi government trying to build world class medical facilities in maharashtra says cm uddhav thackeray)   

उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.      

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तिथं आपण प्रयोगशाळा सुरू करीत आहोत. कोरोनाचा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोगशाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे. 

हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यात उभारणार कोरोना चाचणी प्रयोगशाळा- उद्धव ठाकरे

कोरोनाने आपल्याला जगायचं कसं हे शिकविलं असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचित केलं. आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन व जनतेने  सतत हात धुणं, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणं व मास्क लावण्यासाठी जनजागृती करून ते नियम कठोरपणे व कटाक्षाने पाळावे लागतील, असंही त्यांनी नमूद केलं. प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी कारण जोपर्यंत व्हॅक्सिन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी आरेाग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या प्रयोगशाळेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्ग हा प्रशिक्षितच असायला हवा. तसंच सर्वांनी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचं उदिष्ट पूर्ण होणार असून आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचं आहे. कारण जिल्ह्यातील मृत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत. विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होतं. मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.  

हेही वाचा - केरळातील वैद्यकीय पथकाला पुन्हा निमंत्रण, CM उद्धव ठाकरेंची विनंती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा