Advertisement

केरळातील वैद्यकीय पथकाला पुन्हा निमंत्रण, CM उद्धव ठाकरेंची विनंती

केरळनं यापूर्वी महाराष्ट्राला वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. पण रुग्णांचा वाढता आकडा पाहता आणखी एक पथक पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री करत आहेत.

केरळातील वैद्यकीय पथकाला पुन्हा निमंत्रण, CM उद्धव ठाकरेंची विनंती
SHARES

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवण्याची विनंती केली आहे. केरळनं यापूर्वी महाराष्ट्राला वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. जानेवारीच्या उत्तरार्धात केरळमध्ये पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. पण तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश आलेलं देखील हे पहिलं राज्य म्हणून समोर येत आहे.

जूनच्या सुरुवातीला, केरळमधील १०० हून अधिक डॉक्टर आणि परिचारिका व्हायरस विरूद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाल्या. मुंबईतील रुग्णालयांमधल्या कर्मचाऱ्यांचा खांद्याला खांदा लावून कोरोना रुग्णांवर उपचार केले. आता COVID 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांची टीम पाठवण्याची विनंती केली आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरे लिहितात की, “कोविड प्रतिसादासाठी आम्ही आमच्या वैद्यकीय सेवा आणि बेड्स वाढवत आहोत. केरळमधील डॉक्टर आणि परिचारिकांचं एक टीम महाराष्ट्रात पाठवावं यासाठी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो.”


हेही वाचा : दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड या भागात रुग्ण वाढीचा दर अधिक


याव्यतिरिक्त, मुख्यमंत्र्यांनी पल्मोनोलॉजिस्ट, फिजिशियन, इंटिव्हायसिस्ट तसंच आयसीयू प्रशिक्षित नर्ससाठी विनंती केली आहे. डॉ संतोष कुमार यांच्या नेतृत्वात केरळमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांची टीम आधीच राज्यात कार्यरत असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.

नुकतंच मुख्यमंत्र्यांनी मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स आणि वांद्रे कुर्ला संकुलात अनुक्रमे पाच नवीन कोविड उपचार सुविधा पुरवणाऱ्या केद्रांचं उद्घाटन केलं.

आठवड्याच्या सुरूवातीला पालिकेनं पोस्ट केलेल्या आकडेवारीनुसार शहरातील संस्थांमध्ये सुमारे ७ हजार २०८ बेड्स रिक्त आहेत. तथापि या आकडेवारीत संशायस्पद रुग्णांचा देखील समावेश आहे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असेल.

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ पाहता आपल्याला अधिक बेड्सची आवश्यक्ता पडू शकते. त्यामुळे पालिका उपलब्ध होईल त्या ठिकाणी क्वारंटाईन केंद्र उभारत आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये प्रकरणे वाढत असल्यानं पालिका आणि राज्य सरकारनं शाळा आणि इतर सार्वजनिक संस्था ताब्यात घेतल्या आहेत.हेही वाचा

Coronavirus Pandemic : राज्यात ६६०३ नवे रुग्ण, १९८ जणांचा दिवसभरात मृत्यू

मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा