Advertisement

'या' प्रयोगशाळांमध्ये जाऊन करता येईल तुम्हाला कोरोना चाचणी!

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज भासणार नाही. त्यामुळे कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तीला थेट वैद्यकीय चाचणी करता येणार आहे.

'या' प्रयोगशाळांमध्ये जाऊन करता येईल तुम्हाला कोरोना चाचणी!
SHARES

खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची (प्रिस्क्रिप्शन) गरज भासणार नाही. त्यामुळे कोरोनाची लक्षणं असलेल्या व्यक्तीला थेट वैद्यकीय चाचणी (bmc issued list of covid 19 testing lab in mumbai) करता येणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबतची नवीन नियमावली जाहीर केली आहे.

इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नियमावलीनुसार आतापर्यंत खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. पण आता पालिकेच्या नव्या नियमानुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेत डाॅक्टरांच्या चिठ्ठीटी गरज भासणार नाही. तसंच प्रयोगशाळेपर्यत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची परवानगीही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे.

  • "आयसीएमआर" मार्गदर्शक तत्त्वांनुसार वैद्यकीय प्रयोगशाळा आरटी-पीसीआर तपासणी करू शकतात
  • तपासणीसाठी वैद्यकीय प्रपत्र/स्वयं घोषणा पत्राची गरज नाही
  • सरकारी व महापालिका प्रयोगशाळांनी दाखल रुग्णांची तपासणी करण्याची सूचना
  • तपासण्या वाढवण्याची सहायक आयुक्तांना सूचना

हेही वाचा - कोरोना चाचणीसाठी आता डॉक्टरांच्या चिठ्ठीची नाही गरज

त्यानुसार महापालिकेने १७ प्रयोगशाळांची यादी जाहीर केली आहे जिथं डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोरोनाची चाचणी करता येऊ शकेल. या प्रयोगशाळांमध्ये जाऊन चाचणी केल्यास २५०० रुपये शुल्क द्यावे लागतील, तर प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्याने घरी जाऊन चाचणी केल्यास २८०० रुपये शुल्क द्यावे लागतील. प्रयोगशाळांची यादी पुढीलप्रमाणे :

1. Thyrocare

2. Suburban

3. HN Reliance

4. Metropolis

5. SRL

6. Infexn

7. Kokilaben

8. SRL Phadke

9. IGENETICS

10. PD Hinduja

11. Qualilife Diagnostics

12. Dr. Jariwala

13. Nanavati Hospital

14. Sunflower

15. NM Medical

16. Jaslok

17. Life Care Diagnostic

हेही वाचा - मिरा-भाईंदरमध्ये घरातील विलगीकरण बंद, 'हे' आहे कारण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा