Advertisement

कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी, 'इतका' दर आकारला जाणार

राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आता निम्म्याने कमी केले आहेत.

कोरोना चाचणीचे दर निम्म्याने कमी, 'इतका' दर आकारला जाणार
SHARES

राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आता निम्म्याने कमी केले आहेत. कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी या चाचणीची किंमत अनुक्रमे 4500 व 5200 अशी होती.   

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना चाचणीचे दर कमी केल्याची माहिती दिली. संपूर्ण देशात एवढे कमी शुल्क अन्यत्र कुठेही नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. समितीने शासनाला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात केले आहेत. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार खाजगी लॅब इतकीच  रक्कम आकारू शकतात. ते म्हणाले, जर खाजगी प्रयोगशाळेने यापेक्षा अधिक शुल्क आकारले तर त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

 सध्या राज्यात सध्या 53 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 95 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत 6 लाख 24 हजार 977 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 1 लाख 01 हजार 141 नमुने पॉझिटिव्ह (16.18 टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा