Advertisement

मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू

तर मुंबईत बुधवारी दिवसभरात ११०१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५९ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्

मुंबईत कोरोनाचे १३८१ नवे रुग्ण, ६२ जणांचा दिवसभरात मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज राज्यात कोरोनाचे १९८ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १३८१ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत बुधवारी दिवसभरात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः- वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत बुधवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२ रुग्ण दगावले आहेत. तर ६ जुलै रोजी ३९ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ५ जुलै रोजी एकूण ६९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, बुधवारी मुंबईत कोरोनाचे १३८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ८७ हजार ५१३ इतकी झाली आहे. तर मुंबईत बुधवारी दिवसभरात ११०१ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ५९ हजार २३८ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः- Maratha reservation: मराठा आरक्षणावर आता दररोज सुनावणी

राज्यात आज कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा