Advertisement

वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी


वेळापत्रकानुसार लोकल सुरु करा, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणी
SHARES

लॉकडाऊनच्या ५व्या टप्प्यात राज्य सरकारनं अनलॉक 1.0च्या अंतर्गत लोकल सेवा सुरु केली. मुंबईची लोकल रुळावर आल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवासाची परवानगी देण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली असली तरी लोकल वेळेत येत नसल्यामुळं वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वेळेत निश्चित स्थळी पोहोचता येत नाही. त्यामुळं लोकल वेळापत्रकानुसार चलविण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात पश्चिम रेल्वेला पत्रही देण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वाणगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे, वैतरणा येथून बोरिवली व अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भगवती रुग्णालय बोरिवली, ओशिवरा कपूर, नायर, के एम सायन अशा अनेक रुग्णालयातील ३०० डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवेसाठी दररोज काम करत करतात. दररोज लांबचा प्रवास यांना करवा लागतो.

मात्र, लोकल वेळेवर येत नसल्यामुळं या कर्मचाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळं लोकल वेळापत्रकानुसार सुरु कराव्यात अशी मागणी कर्मचारी करत आहेत. त्याशिवाय, पश्चिम रेल्वेच्या डहाणू रोड स्थानकातून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करण्यासाठी पहाटे ५, सकाळी ११:३०, संध्याकाळी ६:१० वाजता लोकल सेवा द्यावी. तसंच, परतीच्या प्रवासासाठी बोरिवली स्थानकातून सकाळी ७:३८, दुपारी २:३० आणि रात्री ९:१० वाजता लोकल सेवा द्यावी अशी मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा