Advertisement

जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत बंद ठेवण्यात आलेले शाॅपिंग माॅल आणि जिम सुरू करण्यावर सध्या राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

जिम, माॅल सुरू करणार पण.., राजेश टोपेंनी केला खुलासा
SHARES

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत बंद ठेवण्यात आलेले शाॅपिंग माॅल आणि जिम सुरू करण्यावर सध्या राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. परंतु मुंबईतील लोकल ट्रेन सुरू करायची की नाही याचा अंतिम निर्णय हा सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. (maharashtra government thinking to start gym and shopping malls says health minister rajesh tope)

महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन अंतर्गंत टप्प्याटप्प्याने लाॅकडाऊन शिथिल केलं जात आहे. काही अटी शर्थींच्या आधारे उद्योगधंद्यांना परवानगी दिली जात आहे. मुंबई महानगर प्रदेशात जिल्हांतर्गत वाहतुकीला, व्यवहारांना राज्य सरकारने परवानगी दिलेली आहे. सरकारने लहान दुकानं, बाजारपेठा सम-विषम पद्धतीने सुरू करायला, सूलन व्यवसायाला देखील परवानगी दिली आहे. परंतु अद्याप मोठे शाॅपिंग माॅल आणि सोबतच जिमवरील बंदी कायम असल्याने ते कधी सुरू हाेणार, असे प्रश्न सरकारला विचारले जात आहेत. 

हेही वाचा - मी काही डोनाल्ड ट्रम्प नाही- उद्धव ठाकरे

त्यावर बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, सद्याच्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिम आणि शॉपिंग मॉल सुरु करावेत की नाही? याबाबत राज्य सरकार अनेक अंगांनी विचार करत आहेत. त्यातील व्यायामशाळा अर्थातच जिम जनतेच्या आरोग्यांच्यादृष्टीनं गरजेचं असल्याने त्यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. याबाबतचा निर्णय देखील लवकरच सर्वांना कळवण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होताच महाराष्ट्र सरकारने सर्वात पहिल्यांदा राज्यातील जिम आणि शाॅपिंग माॅल्स, थिएटर बंद करण्याचे निर्देश दिले होते. माॅलमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदी करण्यासाठी येत असल्याने या ठिकाणी कोरोना जलदगतीने पसरूशकतो, अशी भीती सर्वांनाच वाटत असल्याने माॅल्स आतापर्यंत बंदच ठेवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला जिम आरोग्याच्या दृष्टीने गरजेची असली, तरी या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठीण असल्याने जिम देखीलआतापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु इतर उद्योगधंदे सुरू होत असताना जिम मालक आणि शाॅपिंग माॅलमध्ये दुकाने असणारे व्यापारी यांचं मात्र मोठं नुकसान होत आहे.

त्यामुळेजिमआणि माॅल सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी या व्यावसायिकांकडून सातत्यानेकेलीजातआहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा