Advertisement

सलून चालकांना राज्य सरकारचा दिलासा


SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या सलून चालकांना अखेर राज्य सरकारने दिलासा दिला आहे. अनलॉक 1.0 च्या अंतर्गत राज्य सरकारनं २८ जूनपासून सलून सुरु करण्याची परवानगी दिली. त्यानुसार, मुंबईतील अनेक सलून सुरु झाले आहेत. मात्र केवळ केस कापण्याची परवानगी दिली. त्यामुळे केसं कापून व्यवसाय कसा करायचा असा सवाल सलून मालकांना पडला आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेनं सलून, ब्युटी पार्लर व मंगल कार्यालये तसंच, सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, यासाठी सुधारित निर्देश जारी केले आहेत.

केस कापणारा आणि केस कापून घेणारा दोघांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल. थोडे दिवस निरीक्षण केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. ब्युटीपार्लर, स्पा आणि जीमबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा