Advertisement

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल

महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण, लीलावती रुग्णालयात दाखल
SHARES

महाविकास आघाडी सरकारमधील महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांना वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (maharashtra state minister abdul sattar and rajya sabha mp fauzia khan tested covid 19 positive)

सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार फौजिया खान या देखील कोविड १९ पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. परभणी इथं घेण्यात आलेल्या अँटिजन टेस्टमध्ये त्या पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.

अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री आहेत. कोरोनाची लागण झाल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनीच आपल्या ट्विटर हँडलवरून दिली. थोडी शंका आली होती म्हणून कोरोना तपासणी केली, दुर्दैवाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करताना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल, असं अब्दुल सत्तार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

अब्दुल सत्तार यांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यावर त्यांना सुरूवातीला प्राथमिक उपचार देऊन शासकीय निवासस्थानीच होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर त्यांना ताप व इतर त्रास होऊ लागल्यानंतर पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डाॅ. जलील परकार यांच्या देखरेखेखाली सध्या सत्तार यांच्यावर उपचार सुरू आहेत. सत्तार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

हेही वाचा - कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण

कोरोनाची लागण झालेले अब्दुल सत्तार हे ठाकरे सरकारमधील पाचवे मंत्री ठरले आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. सध्या ते देखील आपल्या घरातच क्वारंटाईनमध्ये असून तिथूनच ते आपल्या विभागाचा कारभार करत आहेत. त्याआधी धनंजय मुंडे, अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड देखील कोरोनाग्रस्त झाले होते. परंतु उपचार घेऊन बरे झाल्यानंतर हे सर्वजण पुन्हा आपापल्या कामात सक्रीय झाले आहेत. 

महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कोरोनाबाधित रुग्णंची संख्या सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा आकडा पार केला होता. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ३ लाखांचा आकडा टप्पा ओलांडला होता.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील धारावी आणि वरळी परिसराला कोरोनाने विळखा घातला हाेता. परंतु हा विळखा हळुहळू सुटत चालला असला, तरी मुंबई उपनगरात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने या परिसरातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी मेडिकल कॅम्प आणि फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. सोबतच स्मार्ट हेलमेट स्क्रिनिंगच्या माध्यमातून देखील रहिवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

 हेही वाचा - दहिसरचे भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोराेना पाॅझिटिव्ह

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा