Advertisement

धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात, मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात, मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोमवार २२ जून २०२० रोजी दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या ११ दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मुंडे यांच्यासोबतच कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, स्वीय सहाय्यक (बाॅम्बे हाॅस्पीटल), २ वाहन चालक आणि एका अंगरक्षकाची (सरकारी रुग्णालय) दुसरी कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आल्यानंतर या सगळ्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता केवळ एक अंगरक्षक व एक स्वयंपाकी अशा दोघांवरच रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती सुधारत आहे. 

हेही वाचा - धनंजय मुंडे फायटर - राजेश टोपे

१२ जून रोजी धनंजय मुंडे आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे धनंजय मुंडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यानंतर मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना केवळ श्वसनाचा त्रास जाणवत होता. कोरोनाची इतर कुठलीही लक्षणं जाणवत नव्हती. त्यांनतर मुंडे यांना दक्षिण मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

धनंजय मुंडे फायटर आहेत. ते कोरोनावर मात करून लवकरच बरे होतील आणि पुन्हा एकदा सक्रीय होतील, अशा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर कोरोनावर मात करत धनंजय मुंडे आपल्या निवासस्थानी रवाना झाले. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा - आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा