Advertisement

Total Lock down in Ambernath: आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपरिषदेने घेतला आहे.

Total Lock down in Ambernath: आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन
SHARES

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता अंबरनाथमध्येही ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपरिषदेने घेतला आहे. मंगळवार २३ जून २०२० पासून हा लाॅकडाऊन सुरू (total lockdown in ambernath till 30th june 2020 from municipal council due to coronavirus) होणार आहे. यासंबंधीचा आदेश नगरपरिषदेकडून जारी करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनच्या काळात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत.

अंबरनाथ शहरात शनिवारी पहिल्यांदाच दिवसभरात १३१ नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. रुग्णवाढीचा हा वेग पाहता, शहरात ३० जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रशासकांकडे केली होती. त्यानुसार मंगळवार २३ जूनपासून शहरातील पश्चिम भागातील व्यापारी आस्थापना ३० जून पर्यंत बंद करण्याचे आदेश प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी दिले.

हेही वाचा - कांदिवली, बोरीवली, दहिसरमधील रहिवाशांना करावंच लागेल 'या' नियमांचं पालन

अंबरनाथ नगरपरिषदेकडून जारी करण्यात पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, अंबरनाथ नगरपरिषद हद्दीत करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य विषयक आणि आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या हेतूने सदर विषाणूंची संक्रमणाची साखळी तोडणं आवश्यक आहे. सदर साखळी तोडण्याच्या अनुषंगाने शहरातील गर्दी कमी करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दूध, फळे, पालेभाज्या यांची घरपोच सेवा व दवाखाने सुरु असणार आहे. २३ जून ते ३० जून दरम्यान ही सर्व दुकानं बंद राहणार असून नागरिकांनी गर्दी टाळावी. अन्यथा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावंर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रामध्ये रविवार २१ जून २०२० पर्यंत ११३९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी दिवसभरात ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९९ रुग्णांवर रुग्णालयात आणि १९४ रुग्णांवर घरी उपचार (home quarantine) सुरू आहेत. ५१७ कोरोनाबाधित रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे २९ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

याआधी भिवंडी शहरात १५ दिवसांसाठी विशेष टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. भिवंडीतील ही विशेष टाळेबंदी ३ जुलै रोजी संपणार आहे. या दरम्यान रहिवाशांनी नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. 

हेही वाचा - Bhagwati Hospital ICU: बोरीवलीच्या भगवती रुग्णालयातील आयसीयू अखेर २ वर्षांनी सुरू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा