Advertisement

दहिसरचे भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोराेना पाॅझिटिव्ह

दहिसरच्या वाॅर्ड क्रमांक २ मधील भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांची प्रकृती ठिक असून सद्यस्थितीत ते आपल्या घरातच क्वाॅरंटाईन आहेत.

दहिसरचे भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोराेना पाॅझिटिव्ह
SHARES

दहिसरच्या वाॅर्ड क्रमांक २ मधील भाजप नगरसेवक जगदीश ओझा कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांची प्रकृती ठिक असून सद्यस्थितीत ते आपल्या घरातच क्वाॅरंटाईन आहेत. शिवाय ते घरातूनच आपल्या विभागासंदर्भातील कामे करत आहेत. खरं तर ओझा यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणं नव्हती तरीही त्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना टेस्ट करून घेतली होती. या टेस्टमध्ये जगदीश ओझा कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. (BJP corporator Jagdish Ojha Corona positive)

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख हे देखील कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. सध्या ते देखील आपल्या घरातच क्वारंटाईनमध्ये असून तिथूनच ते आपल्या विभागाचा कारभार करत आहेत. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत कोरोनाबाधित रुग्णंची संख्या सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा आकडा पार केला होता. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ३ लाखांचा आकडा टप्पा ओलांडला होता. 

हेही वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार रहा, मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील धारावी आणि वरळी परिसराला कोरोनाने विळखा घातला हाेता. परंतु हा विळखा हळुहळू सुटत चालला असला, तरी मुंबई उपनगरात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसल्याने या परिसरातील कोरोना रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी मेडिकल कॅम्प आणि फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत. सोबतच स्मार्ट हेलमेट स्क्रिनिंगच्या माध्यमातून देखील रहिवाशांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे.

दरम्या, जगभर जे निरीक्षण सुरू आहे, त्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, असं म्हटलं जात आहे. दुसरी लाट तेव्हाच येते, ज्यावेळी आपण गाफील राहतो. त्यामुळे आपण आणखी सतर्क राहूया. रुग्णसंख्येचा हा आलेख कमी होईल यासाठी प्रयत्न करूया. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावं लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. सुरूवातीला कोरोना शहरात होता. आता प्रसार ग्रामीण भागातही होऊ लागला आहे. राज्याच्या अन्य भागातही या सुविधांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा