Advertisement

मुंबई, पुण्यातल्या ५ हजार लोकांवर लवकरच कोरोना लशीची ट्रायल

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सीरम इंस्टिट्यूटच्या व्हॅक्सीनचे ट्रायल सर्वात आधी पुणे आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या पाच हजार लोकांवर होणार आहे.

मुंबई, पुण्यातल्या ५ हजार लोकांवर लवकरच कोरोना लशीची ट्रायल
SHARES

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना व्हॅक्सीनच्या निकालांमध्ये समाधानकारक परिणाम मिळाल्यानंतर आता यूकेमध्येही मोठ्या प्रमाणात ट्रायल सुरू केले आहेत. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी आणि सीरम इंस्टिट्यूटच्या व्हॅक्सीनचे ट्रायल सर्वात आधी पुणे आणि मुंबईतील हॉटस्पॉट झोनमध्ये राहणाऱ्या पाच हजार लोकांवर होणार आहे. व्हॅक्सीनचे स्थानिक उत्पादन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियानं आशा व्यक्त केली आहे की, सर्वकाही ठीक राहिल्यास पुढील वर्षापर्यंत व्हॅक्सीन लाँच होईल.

मुंबईत १ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण झाले आहेत. राज्यभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण पुणे आणि मुंबई या दोन शहरात आहेत. सीरम इंस्टीट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं की, मुंबई आणि पुण्यातील अनेक ठिकाणांना आम्ही व्हॅक्सीनच्या ट्रायलसाठी शॉर्टलिस्ट केले आहे. या शहरात सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत.

हेही वाचा : एकूण रुग्णांपैकी २४ टक्के कोरोनाबाधित मुंबईत अॅक्टिव्ह

सुरुवातीच्या टप्प्यात व्हॅक्सीन सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. यामुळे देशात होणाऱ्या ट्रायलमध्ये वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सामील केलं जाईल. व्हॅक्सीन तयार करण्यासाठी कंपनी विशेष परवानगी घेणार आहे आणि दर महिन्याला ७ कोटी डोस तयार करण्याची योजना आहे, असं पूनावाला यांनी सांगितलं.

सोमवारी क्लीनिकल ट्रायलचे परिणाम ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं जाहीर केले होते. त्याचे परिणाम चांगले असल्याचं देखील सांगितलं होतं. मेडिकल जर्नल द लैंसेटमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे.



हेही वाचा

अंधेरी वेस्टमध्ये डोअर टू डोअर स्क्रिनिंग, रुग्णांची ओळख होण्यास होतेय मदत

झोपडपट्ट्यांनंतर, पालिकेचं मुंबईतल्या इमारतींमध्ये लक्ष केंद्रित

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा