Advertisement

अंधेरी वेस्टमध्ये डोअर टू डोअर स्क्रिनिंग, रुग्णांची ओळख होण्यास होतेय मदत

K West वॉर्डमधील काही भाग सांताक्रूझपासून विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि ओशिवारापर्यंत डोअर टू डोअर सेवा पुरवली जातेय.

अंधेरी वेस्टमध्ये डोअर टू डोअर स्क्रिनिंग, रुग्णांची ओळख होण्यास होतेय मदत
SHARES

K West वॉर्डमध्ये कोरोनाव्हायरसचे वाढते रुग्ण पाहता महापालिकेनं डोर-टू-डोर स्क्रिनिंग सेवा सुरू केली आहे. K West वॉर्डमधील काही भाग सांताक्रूझपासून विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि ओशिवारापर्यंत आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा वॉर्ड सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. मार्चपासूनसुरू झालेल्या पालिकेच्या या तपासणीमुळे १ हजार २५८ रूग्ण सापडले. हा आकडा वॉर्डमधील एकूण ५ हजार ३२४ प्रकरणांपैकी एक चतुर्थांश आहे.

प्रभागातून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चपासून डोर-टू-डोर पध्दतीचा वापर करून ६१ हजार ५३१ घरांपैकी एकूण २ लाख ३७ हजार ९३३ नागरिकांची स्क्रिनिंग केली गेली. या पद्धतीमुळे COVID 19 ची लक्षणं असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या केल्या गेल्या. याशिवाय त्यांच्यावर उपचार देखील केले गेले. यापैकी, १ हजार ६०४ लोकांना कोरोनाव्हायरसची चाचणी करून घ्यावी लागली. त्यापैकी १ हजार २५८ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. या पद्धतीत पालिकेला जास्त वेळ लागला असला तरी, लवकरात लवकर रुग्ण शोधण्यात मदत झाली.

यापूर्वी २२ जूनपासून बोरिवली आणि कांदिवलीसारख्या भागात डोर-टू-डोर स्क्रीनिंग सुरू झाली. अधिका्यांनी रेड झोन आणि कंटेनमेंट झोन तसंच परिसरातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळींमध्ये राहणाऱ्या लोकांना भेट दिली. हेल्मेंट स्क्रिनिंग सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्ण शोधण्यात आले.

झोपडपट्टी क्षेत्राव्यतिरिक्त मुंबईतील पॉश भागात राहणारे लोकही आता कोरोनाबाधित होत आहेत. त्यामुळे इमारतींमध्ये डोर-टू-डोअर स्क्रीनिंग केलं जात आहे. तसंच बर्‍याच इमारतींनाही सील ठोकण्यात आलं आहे.

सध्या मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या १ लाखाहून अधिक झाली आहे. तर ५ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. मात्र, बरे झालेल्या रुग्णांची संख्याही ७२ हजारांच्या पुढे गेली आहे.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा