Advertisement

ग्लेनमार्क फार्मा कंपनीला नोटीस, COVID 19 वरील औषधं जास्त किंमतीत विकल्याचा आरोप

DCGIनं ग्लेनमार्क फार्मावर औषधं जास्त किमतीत विकत असल्याचा आरोप केला आहे.

ग्लेनमार्क फार्मा कंपनीला नोटीस, COVID 19 वरील औषधं जास्त किंमतीत विकल्याचा आरोप
SHARES

ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियानं (DCGI) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सकडून COVID 19 वरील औषधाच्या चुकिच्या दाव्यांबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. याशिवाय DCGIनं ग्लेनमार्क फार्मावर औषधं जास्त किमतीत विकत असल्याचा आरोप केला आहे.

यासंदर्भात संसदेतल्या खासदारांच्या तक्रारीनंतर DCGI कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. ग्लेनमार्कनं प्रस्तावित केलेल्या उपचाराचा एकूण खर्च हा देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या हिताचा नाही, असा दावा खासदारांनी केला. तथापि, १३ जुलै रोजी, फार्मास्युटिकल कंपनीनं आपल्या फॅव्हीपिरावीर, फाबीफ्लू या औषधांच्या किंमती प्रति टॅबलेट १०३ वरून ७५ वर आणल्या आहेत. जवळपास २५ टक्क्यांहून अधिक किंमती कमी केल्या आहेत. यामुळे आता ही औषधं सर्वसामान्यांना परवडतील.

खासदारांनी केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, फार्मा कंपनीची औषधं मधुमेह आणि उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी प्रभावी असल्याचा चुकिचा दावा केला जात आहे. यातून लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रोटोकॉल सारांशानुसार, औषधासाठी केलेली चाचणी फाबीफ्लूचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केलेली नव्हती. जूनच्या सुरुवातीस, भारताच्या सेंट्रल स्टँडर्ड ड्रग कंट्रोल ऑर्गनायझेशननं (CSDO) ग्लेनमार्कच्या फॅबीफ्लूला कोरोनायरस संसर्गाच्या उपचारांसाठी होकार दिला होता.

या घटनेनंतर सोमवारी फार्मा जायंटचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर हा शेअर ५.१० टक्क्यांनी घसरून ४०८ वर आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE)मध्ये तो ५.७५ वरून ४०५ वर आला आहे.



हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 'इतकं'

मुंबईतल्या सील केलेल्या इमारतींची 'ही' नवीन यादी

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा