Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४२१ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ४२१ रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत ४२१ नव्या रुग्णांची नोंद
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन ४२१ रुग्ण आढळले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील कोरोना रुग्णांनी आता १७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

 ४२९ रुग्णांना गेल्या २४ तासांत घरी सोडण्यात आलं आहे.  नवीन ४२१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १७,०२३  झाली आहे. यामध्ये ५८९४ रुग्ण उपचार घेत असून १०८५७  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७८, कल्याण प. ११९, डोंबिवली पूर्व १३६, डोंबिवली प ५८, मांडा टिटवाळा १२, मोहना १४ तर पिसवली येथील ४ रूग्णांचा समावेश आहे.

राज्यात बुधवारी १० हजार ५७६ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर  ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.



हेही वाचा - 

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३०३ रुग्ण

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा