Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 'इतकं'

मिरा-भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णवाढीबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही (रिकव्हरी रेट) या ठिकाणी अधिक आहे.

मिरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 'इतकं'
SHARES

मिरा-भाईंदरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रुग्णवाढीबरोबर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही (रिकव्हरी रेट) या ठिकाणी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

मिरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईच्या तुलनेत येथील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक चांगलं आहे. मुंबईमध्ये हे प्रमाण ७१ टक्के आहे. मिरा-भाईंदरमधील एकूण रुग्णांची संख्या ६ हजारांच्या वर गेली आहे. यामधील ५१५९ रुग्ण बरे झाले आहेत. 


जून महिन्यात रिकव्हरी रेट ८१ टक्के इतका होता.  जुलैच्या पहिल्या १५ दिवसांत २१३४ रुग्ण सुखरुप बरे होऊन घरी गेले आहेत. एप्रिल- मेमध्ये रिकव्हरी रेट २७ आणि ७० टक्क्यांपर्यंत होता. येथील रुग्ण दुपटीचा कालावधीही १३ ते १५ दिवसांपर्यंत आला आहे. 

मीरा-भाईंदरमध्ये मंगवारी कोरोनाचे १५० नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६८३४ रुग्ण आढळले आहेत. तर २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.



हेही वाचा - 

मुंबई कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण, दिवसभरात ६५ जणांचा मृत्यू

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा