Advertisement

एकूण रुग्णांपैकी २४ टक्के कोरोनाबाधित मुंबईत अॅक्टिव्ह

सध्या मुंबईत एक लाखाहून अधिक COVID 19 रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी २४ हजार ०३९ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत.

एकूण रुग्णांपैकी २४ टक्के कोरोनाबाधित मुंबईत अॅक्टिव्ह
SHARES

मुंबईत कोरोनव्हायरसची संख्या झपाट्यानं वाढत आहे. सध्या मुंबईत एक लाखाहून अधिक COVID 19 रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी २४ हजार ०३९ रुग्ण सक्रिर्य आहेत. यातल्या १६ हजार ५४१ रुग्णांमध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत. तर ६ हजार १२८ रुग्णांमध्ये लक्षणं दिसून आली. इतर १ हजार ३७० रुग्ण गंभीर आहेत.

आकडेवारीनुसार, मुंबईत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये २३ टक्के लोकं पॉझिटिव्ह आढळली. तर जवळपास ४ लाख ३३ हजार २२७ चाचण्या करण्यात आल्या. आकडेवारीवरून असंही दिसून आलं आहे की, दर दहा लाख लोकांमध्ये, ३३ हजार ३०६ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जर रुग्णांच्या दुप्पट होण्याचा दरावर बोलायचं झालं तर, वॉर्ड RC मध्ये सर्वात कमी म्हणजेच २८ दिवसांवर  डबलिंग रेट आहे. तर वॉर्ड H East मधील दुप्पट दर १२८ दिवसांवर आहे. १८ जुलैपर्यंत मुंबईतील दुप्पट दर ५५ दिवसांचा होता. त्यापैकी १६ वॉर्डमध्ये दुप्पट दर ५० दिवसांपेक्षा जास्त होता. शिवाय, एकूण प्रकरणांपैकी ७० टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६ टक्के रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : कोरोनाचा फूल विक्रीला मोठा आर्थिक फटका

COVID 19 च्या रुग्णांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं कंटेनमेंट झोनमधील ६ हजारहून अधिक इमारती सील केल्या आहेत. यात झोपडपट्ट्या आणि चाळींचा देखील समावेश आहे. पालिकेनं स्थापित केलेल्या कॉल सेंटरवर कोरोनो विषाणूशी संबंधित प्रश्नांबाबत आतापर्यंत एकूण १ लाख ९८ हजार ५६७ कॉल आले.

वॉर्ड M east मधील ६९१ कंटेंट झोनपैकी ७५ रेड झोन सील करण्यात आले आहेत. त्यानंतर वॉर्ड L मधील ७४ आणि S मधील ६९ इथले रेड झोन सील केले आहेत. याव्यतिरिक्त, मुंबईत एकूण ६ हजार १६३ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यापैकी वॉर्ड R central मध्ये ७७७, वॉर्ड K east मध्ये ७१६ इमारती आणि R south मध्ये ५५७ इमारती सील केल्या आहेत.

K East वॉर्डमध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत त्यानंतर वॉर्ड P North आणि वॉर्ड G North यांचा नंबर लागतो. K East मध्ये अनुक्रमे 6 upej 590, P North ६ हजार २२० आणि G North मध्ये ६ हजार ००१ रूग्ण आहेत.

याव्यतिरिक्त, मुंबई शहरातील कोरोना रुग्णांचा विकास दर सध्या १.६ टक्के आहे. सर्व वॉर्डपैकी R Central मध्ये सर्वाधिक विकास दर २.५ टक्के आहे. त्यानंतर वॉर्ड D, R South आणि वॉर्ड T मध्ये १.९ टक्के आहे.



हेही वाचा

कूपर रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून खुलासा

मुंबई महापालिकेला दुसरा धक्का, आरोग्य समितीच्या अध्यक्षांनाच कोरोनाची लागण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा