Advertisement

कूपर रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून खुलासा

मृत्यूच्या कारणाची नोंद पाहून मृतदेह घरी नेण्यास परवानगी नसल्याने संबंधित मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनावर आरोप केला

कूपर रुग्णालयातील ‘त्या’ रुग्णाच्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून खुलासा
SHARES

पालिकेच्या विलेपार्ले (Vile Parle) स्थित डॉ. आर. एन. कूपर (Cooper hospital) महानगरपालिका रुग्णालयामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडून रुग्णालय परिसरात आरडा ओरडा केला. त्यावेळी नातेवाईकांनी डाॅक्टरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नही उपस्थित केले. तसेच त्याचा व्हिडिओ हा सोशल मिडियावर टाकण्यात आला.  मात्र या प्रकरणबाबत पालिकेने आता खुलासा करत, मृत व्यक्तीच्या नातेकावाईकांचे आरोप फेटाळून लावलेले आहे.

हेही वाचाः- लाॅकडाऊनचे उल्लंघन, पोलिसांनी केल्या ९२ हजार गाड्या जप्त

पालिकेने दिलेल्या माहितीनूसार, रविवार, दिनांक १९ जुलै २०२० रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास कूपर रुग्णालयात अंदाजे ३० वर्ष वयाच्या तरुणाला उपचारार्थ आणण्यात आले. यावेळी सदर तरुणाच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होते. रुग्णालयात आणल्यानंतर वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाची तत्काळ तपासणी केली. तसेच क्ष-किरण तपासणी करुन तातडीने उपचार सुरु केले. मात्र, काही वेळातच म्हणजे रात्री ११.१५ च्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.  क्ष-किरण परीक्षण व वैद्यकीय निरीक्षणानुसार त्या मृत तरुणाला न्यूमोनियाची लागण झालेली होती, असे लक्षात आले. तसेच कोविड १९ (COVID19) विषाणू संसर्गाच्या काही लक्षणांशी न्यूमोनिया आजारातील काही लक्षणांचे साम्य आहे. तसेच कोविड १९ संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेता, रुग्णाच्या मृत्यूचे कारण नोंदवताना तीव्र न्यूमोनिया सह कोविड १९ बाधा संशय हे कारण नोंदवण्यात आले. संबंधित रुग्णाचा मृतदेह अंत्यविधीसाठी घरी नेण्याची या नातेवाईकांची मागणी होती. मात्र, मृत्यूच्या कारणाची नोंद पाहून मृतदेह घरी नेण्यास परवानगी नसल्याने संबंधित मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करीत रुग्णालय प्रशासनावर आरोप केला. रुग्णालय प्रशासनाने नियमानुसार, सदर मृतदेह पोलिसांकडे सुपूर्द केला.

हेही वाचाः- जी.व्हि.के ग्रुपचे चेअरमन जी वेंकट कृष्णा रेड्डी यांच्या अडचणीत वाढ,  सीबीआयने फास आवळला

याठिकाणी पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते की, कोविड १९ संसर्गाच्या अनुषंगाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), केंद्र व राज्य सरकार यासह विविध सक्षम प्राधिकारी यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱया निर्देशांना अनुसरुनच सर्व वैद्यकीय पद्धती (मेडिकल प्रोटोकॉल) पाळले जातात. मृत्युंच्या कारणांची नोंद करताना देखील त्याचे काटेकोर पालन केले जाते. त्यामुळे संशयित कोविड १९ बाधा हे कारणदेखील त्यास अनुसरुनच नोंदवण्यात आले होते. त्यासाठी संबंधित डॉक्टर अथवा रुग्णालय प्रशासन यांना दोषी धरणे योग्य नाही. तसेच रुग्णालयाकडून तातडीने व योग्य असेच उपचार रुग्णाला पुरवण्यात आले होते. त्यामध्ये कोणताही निष्काळजीपणा केलेला नसल्याचे पालिकेने स्पष्ठ केले आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा