Advertisement

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतील 'हे' परिसर आणि कोळीवाडे सील करण्यात आले आहेत.

जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले इथले 'हे' ७ परिसर सील
SHARES

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईतील झोपडपट्टी परिसर आणि कोळीवाडे सील करण्यात आले आहेत. हे सर्व परिसर के / पश्चिम (West) या क्षेत्रात येतात. या भागात अंधेरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम आणि जोगेश्वरी पश्चिम यांचा समावेश आहे.

पालिकेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, सील करण्यात आलेले ७ विभाग हे सर्व झोपडपट्टी क्षेत्रात येतात. जिथे सुमारे १.२ लाख नागरिक राहतात. कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

के / पश्चिम (अंधेरी वेस्ट, विलेपार्ले वेस्ट आणि जोगेश्वरी वेस्ट) मधला सील केलेला परिसर खालील प्रमाणे आहे.

  • नेहरू नगर
  • आनंद नगर
  • जुहू कोळीवाडा
  • जुनैद नगर / समता नगर
  • गाव देवी डोंगरी (गिलबर्ट हिल)
  • जुहू गल्ली
  • वर्सोवा

तथापि, जुहू कोळीवाडा यासारख्या भागात पूर्वी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता होती.पण आता हे परिसर नियंत्रणात आहेत. पालिका अधिकारी या क्षेत्रांना कोरोनामुक्त बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आकडेवारीनुसार, ९ मे २०२० पर्यंत के / वेस्टमधील कंन्टेंनमेंट झोनची संख्या २५५ पर्यंत वाढली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी हे भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला. या २५५ क्षेत्रांपैकी १८० हे जास्त दाटीवाटी आणि गर्दीचे क्षेत्र आहेत. तर ७३ क्षेत्र ही झोपडपट्टी परिसरात येतात. ही सर्व क्षेत्र पुढील १४ दिवसांसाठी सील केले जातील.

याव्यतिरिक्त, अधिकारी अधिक चांगलं व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी टॉवर्स बसवण्याचा विचार करत आहेत. करतील. हे बांबूचे बनलेले असून पुढील दोन किंवा तीन दिवसांत ते तयार होतील.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आवश्यकतेनुसार या संरचनांचा उपयोग जनतेला उद्देशून करण्यासाठी केला जाईल. कारण या भागातील परिस्थिती हाताळणं पोलिस अधिकाऱ्यांना अवघड झालं आहे. या वसाहती व्यवस्थापित करण्यासाठी नियुक्त केलेले पथक आवश्यक सेवा वेळेवर आणि आवश्यक वेळी पुरवल्या जातात की नाही याची खात्री करण्यासाठी जनता आणि रहिवाशांशी समन्वय साधतील.

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वच्छता आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. कारण या वस्त्यांमध्ये वापरल्या जाणार्‍या सार्वजनिक स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी शिफ्टच्या तत्त्वावर काम करण्यासाठी एखादा कर्मचारी नियुक्त केला जाईल.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा