कूपर रुग्णालयात परिचारिकेला मारहाण

डिस्चार्ज नाकारल्यानं प्रसूती झालेल्या महिलेनं परिचारिकेला मारहाण केली.

कूपर रुग्णालयात परिचारिकेला मारहाण
SHARES

मुंबईतील कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या प्रसूती झालेल्या महिलेकडून परिचारिकेला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. डिस्चार्ज नाकारल्यानं संतप्त होऊन मारहाण केली आहे. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रसूती झालेल्या महिलेला मारहाण करण्यापासून गर्भवतीचा पतीही रोखत होता, मात्र त्या कोणाचंही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचं समजतं.

या मारहाणीमुळं परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. या प्रकरणी त्या महिलेवर बुधवारी रितसर तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचं समजतं. त्याचप्रमाणं, परिचारिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या महिला रुग्णाला बाळाला घेऊन घरी जाण्यासाठी तातडीनं डिस्चार्ज हवा होता. मात्र, तिची ही मागणी पूर्ण न झाल्यानं तिनं चिडून परिचारिकेच्या अंगावर धाव घेत तिला मारहाण केली. ती अंगावर धावून येत असताना परिचारिकेनं फोन करून सुरक्षा रक्षकांना कल्पना दिली. मात्र, मदतीसाठी तातडीने कुणीही आले नाही, असा आक्षेप तिच्यासह सहकाऱ्यांनीही घेतला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा