Advertisement

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका एवढ्या दिवस बंद असतील.

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद
SHARES

ऑगस्ट महिन्यात बँका तब्बल १२ दिवस बंद राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण उत्सव असल्यामुळे बँका एवढ्या दिवस बंद असतील. या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या कामांचं नियोजन करावं लागणार आहे. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार यात काही राज्यांत बदल करण्यात आले आहेत. 

ऑगस्ट महिन्यात बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम आणि हरतालिका असे सण आहेत. तसंच या महिन्यात पाच रविवार देखील आहेत. त्याचप्रमाणे ८ आणि २९ ऑगस्ट रोजी दुसरा आणि चौथा शनिवार येणार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत.  

 अशा आहेत सुट्टया 

१ ऑगस्ट शनिवार     -  बकरी ईद
३ ऑगस्ट सोमवार     -  रक्षाबंधन
११ ऑगस्ट मंगळवार   -  गोकुळाष्टमी
१२ ऑगस्ट बुधवार      -  गोकुळाष्टमी
१५ ऑगस्ट शनिवारी    -  स्वातंत्र्य दिन
२१ ऑगस्ट शुक्रवार      - तीज-हरतालिका
२२ ऑगस्ट शनिवार      - गणेश चतुर्थी
३० ऑगस्ट रविवार       -  मोहरम
३१ ऑगस्ट सोमवार      - ओनम 


हेही वाचा -

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा