Advertisement

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता

मागील २४ तासांत मुंबई व आसपासत मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडला.

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता
SHARES

जुलैच्या पहिल्या २ आठवड्यात मुंबई व उपनगरामध्ये चांगला पाऊस झाला. मुसळधार पावसामुळं मुंबईकरांना उकड्याच्या त्राासपासून दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर पावसानं विश्रांती घेतली. पावसाच्या मोठ्या विश्रांतीमुळं मुंबईत पुन्हा उकाडा वाढला. मुंबईत सध्या ढगाळ वातावरण असून मागील २४ तासांत मुंबई व आसपासत मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडला.

सांताक्रूझ येथील वेधशाळेमध्ये १० मिमी आणि कुलाबा इथं २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. स्कायमेटनं दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकच्या किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ फिरत आहे. अरबी समुद्रावरून मध्यम वारे कोकण आणि गोव्याच्या भागातही वाहत आहेत. तसंच, पुढील आठवड्यात मुंबई व उपनगरामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविली जात आहे.

मुंबईतील पावसाच्या कार्यात २ किंवा ३ ऑगस्टच्या आसपास वाढ अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्याची सुरूवातीला मुंबई आणि उपनगरात पावसाची शक्यता आहे. यामुळं एकूणच तापमानात घट होऊन मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.



हेही वाचा -

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!

नालासोपारा आगारात नाशिकहून २० चालक दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा