Advertisement

नालासोपारा आगारात नाशिकहून २० चालक दाखल

नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या आहेत.

नालासोपारा आगारात नाशिकहून २० चालक दाखल
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्याभरात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं सामन्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. केवळ अत्यावशक्य सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी होती. तसंच, या कर्मचऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्याशिवाय, कालांतरान लोकल सेवाही सुरू करण्यात आली. परंतु ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच होती. त्यामुळं सामान्यांना खिशाला कात्री लावून प्रवास करावा लागत होता. यामुळं नालासोपारा इथं अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर नोकरदारांना एसटी बसची सुविधा मिळाली नाही. त्यामुळं प्रवाशांनी नालासोलारा रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोको केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीची पावले एसटी महामंडळाने उचलली आहेत. नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. हि जादा सेवा देण्यासाठी नाशिकहून २० चालक दाखल झाले आहेत.

नालासोपारा आगारातून १२० ते १३० फेऱ्या धावत होत्या. आता १५० ते १६० फेऱ्या धावत आहेत. नाशिकहून देखील चालक दाखल झाले आहेत. नालासोलारा आगारातील जे चालक गैरहजर आहेत. त्यांना फोन करून बोलाविण्यात येत असल्याची माहिती मिळते. दरम्यान, नालासोपारा येथील नोकरदारांना २२ जुलै रोजी सकाळच्या सुमारास एसटीची सुविधा मिळाली नाही. त्यामुळं या नोकरवर्गानं थेट नालासोपारा रेल्वे स्थानकात रेलरोको केला.

पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत आंदोलन केलं. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी सामान्य प्रवाशांना रेल्वे रुळावरून जाण्यास सांगितलं. सध्या फक्त निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु आहे.

सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही अशी समज पोलिसांनी प्रवाशांना दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना हटविण्यात आले. या घटनेनंतर खबरदारी म्हणून एसटीने नालासोलारा आगारातून १२० ते १३० फेऱ्या होत होत्या. तर, आता ३० ते ४० फेऱ्या वाढविल्या आहेत. नालासोलारा आगारात एकूण १०५ चालक आहेत. मात्र यापैकी फक्त ३० चालक येत आहेत. गैरहजर चालक सातारा, विदर्भ या भागात सध्या अडकले आहेत. त्यामुळे त्यांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी सोय नाही. परिणामी, एसटीच्या सेवा वाढविण्यासाठी नाशिकहून २० चालक नालासोलारा येथे दाखल होऊन सेवा देत आहेत.



हेही वाचा -

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!

Exclusive मुंबईतल्या ९४ पोलिस ठाण्यात होणार ‘रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा