Advertisement

नालासोपारा एसटी स्टॅंड परिसरात प्रवाशांचा उद्रेक

खासगी प्रवाशांची संख्या वाढल्यानं नालासोपारा येथील एसटी स्टँड अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आला आहे.

नालासोपारा एसटी स्टॅंड परिसरात प्रवाशांचा उद्रेक
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळं 'आम्हालाही प्रवासाची मुभा द्या', एसटीची सेवा कमी पडत असल्याचं सांगत शंभरहून अधिक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा स्थानक परिसरात जमून आंदोलन केलं. सुरूवातील एसटी स्टँडमध्ये जोरदार आंदोलन केलं, त्यानंतर रेल्वे रुळावर उतरत रेल रोको केला. या सर्व प्रकारात या प्रवाशांनी सामाजिक अंतराच्या नियमाचं उल्लंघन केलं. तसंच, खासगी प्रवाशांची संख्या वाढल्यानं नालासोपारा येथील एसटी स्टँड अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आला आहे.

अजुनही नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचा गोंधळ सुरू आहे. त्याशिवाय, एसटी स्टॅंड परिसरातही ३ ते ३ हजार प्रवाशांनी गर्दी केली आहे. नालासोपारा येथून दररोज सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या व इतर कर्मचाऱ्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जातात. अचानक गर्दी केलेल्या प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे मुंबईला त्यांच्या खाजगी कार्यालयात कामासाठी जाणारे होते. या प्रवाशांनी 'अत्यावश्यक सेवेसाठी सोडल्या जाणाऱ्या बस मधून आम्हाला देखील प्रवास करण्याची परवानगी द्या', अशी आग्रही मागणी केली.

या प्रवाशांना सामाजिक अंतराचं काटेकोर पालन करित, इथं लगेच बसेस उपलब्ध करून देणं शक्य नसल्याचं स्थानिक एसटी प्रशासनानं सांगितलं. मात्र, तरी देखील संतप्त प्रवासी ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील संबंधित प्रवाशांनी समाजिक अंतराचे नियम न पाळता बसस्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळं स्थानिक एसटी प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं व पोलीसांच्या सुचनेनुसार बसस्थानक तातडीनं बंद केले होते, त्यानंतर लगेच सकाळी १०:३० वाजता बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. भविष्यात प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जादा बस फेऱ्यां सोडण्यात येत आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

नालासोपारा एसटी स्टँडमधून कामावर जाणाऱ्यांसाठी १०० ते १५० एसटी सोडल्या जातात. मात्र, बुधवारी बराचवेळ थांबूनही एसटी स्थानकातून एसटी सोडण्यात आली नाही. चौकशी केली असता एसटी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगण्यात आलं. त्यामुळं कामावर जाणाऱ्या प्रवाशांचा संयम सुटला आणि या संतप्त प्रवाशांनी घोषणाबाजी देत आंदोलन सुरू केलं. या आंदोलनता एक एक करत शेकडो प्रवासी सहभागी झाले आणि एसटी स्थानकात एकच गोंधळ उडाला.



हेही वाचा -

नालासोपारा स्थानकात संतप्त प्रवाशांकडून आंदोलन

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा