Advertisement

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!

यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्‍या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही.

यंदा ढोल-ताशांचा आवाज म्यूट!
SHARES

कोरोना व्हायरसनं सर्वच व्यवसाय उद्योगधंद्याला टाळं मारलं. याच सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या कर्मचारी वर्गाला बसला आहे. लॉकडाऊनचे ३ महिने घरी बसून काढले. हळुहळू मुंबई सुरू होतेय हे समजताच अनेकांना दिलासा मिळाला. परंतु, अद्याप अनेक विषयांवर निर्णय होणं बाकी आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ढोल-ताशा पथक. कारण सध्या 'श्रावण' महिना सुरू झाला असून, या दिवसात अनेक सण, उत्सव होत असतात. या निमित्त ढोल-ताशांना मागणी असते. परंतु, कोरोनामुळं अद्याप वाद्याच्या विषयावर निर्णय झालेला नाही. त्यामुळं या वाद्य वाजवून आपली कला जगासमोर मांडणाऱ्यां आणि यातून रक्कम मिळविणाऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे. 

दरवर्षी वर्षाच्या १२ महिन्याच कोणत्याही सणाला, उत्सवाला ढोलताशा, लेझीम पथकांचा रापता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ढोल-ताशांच्या गजरात सर्व जण दंग होऊन थिरकत असतात. काही जण भार हरपून वाद्यांचा आस्वाद घेत असतात. परंतु, यंदा कोरोनामुळं ना वाद्य ना थिरकणं. त्यामुळं सर्वाचीच घडी विसकडली आहे. विशेष बाबा म्हणजे अवघ्या एक महिन्यावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. मात्र, साधेपणानं साजरा करायचा असल्यानं यंदा गणेशोत्सवामध्ये दणाणून सोडणार्‍या ढोल ताशांचा आवाज आपणास ऐकायला मिळणार नाही. सहाजिकच ढोल पथक, लेझीम पथकासह अन्य वाद्य वृंदांवर उपजीविका करणाऱ्या कलाकारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

मंबईसह राज्याभरात कोरोनामुळं मागील ४ महिन्यांपासून सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात सण समारंभ, उत्सव, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येत असतो. गणेशोत्सवावर अनेक घटक अवलंबून असतात. यामध्ये श्री गणेशाची मूर्ती तयार करण्यापासून ते विसर्जनापर्यंत अनेक घटकांमार्फत वेगवेगळ्या सेवा आणि वस्तु पुरविल्या जातात. यामध्ये प्रामुख्यानं हा सण मंगलमय व्हावा यासाठी वाद्यवृंद, ढोल पथक, लेझीम पथक यांचा मोलाचा वाटा असतो. 

बाप्पांच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी वाजत गाजत श्रींची मिरवणूकही काढली जाते. मात्र, यंदा संपूर्ण देशात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यसरकारने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. याला प्रतिसाद देत राज्यातल्या बहुतांश मंडळांनी मोठ्या गणेश मूर्ती रद्द करून शासनाच्या नियमाप्रमाणं ४ फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

या उत्सवामध्ये लोकांची गर्दी होऊ नये आणि पुन्हा कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. गणेशोत्सव आणि ढोल-ताशा पथक यांचे वर्षानुवर्षांचे जुनं नातं आहे. मागील ४ ते ५ वर्षांमध्ये ढोल-ताशा पथकाची आवढ जास्तच वाढली आहे. त्यामुळं प्रत्येक शहरांमध्ये ढोल-ताशा पथक तयार झाली आहेत. 

आपल्या गणपतीचं पाटपूजन, आगमन किंवा विसर्जनाला ढोल-ताशा पथक पाहिजेच, असा प्रत्येक मंडळाचा व गणेशभक्तांचा हट्ट असतो. या ढोल-ताशा पथकांना मिळणाऱ्या बिदागीमुळे दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. जुलै महिना सुरू होताच दरवर्षी गणपतीचे पाटपूजन तसेच आगमन सोहळ्याचे वेध लागतात. या सोहळ्यांना ढोल-ताशा पथकांना आवर्जून बोलावले जाते. त्यामुळंच मुंबईत रस्त्याच्या कडेला अथवा उड्डाणपुलांखाली ढोल-ताशांच्या सरावाचे स्वर कानावर पडतात.हेही वाचा -

विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर

गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वेगाडी सोडण्याची प्रवाशी संघटनांची मागणीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा