Advertisement

आयटीआर भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे.

आयटीआर भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, 'ही' आहे अंतिम तारीख
SHARES

कोरोना संकटकाळामध्ये केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानं (सीबीडीटी) इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत करदात्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती.


सीबीडीटीने ट्वीट करत सांगितलं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआर दाखल करण्यासाठी ३०  सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देत असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सुरूवातीला आयटीआर दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली होती आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे. आयटीआर भरण्यासाठी तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

लाॅकडाऊनमुळे देशात सर्वच आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र आता हळूहळू नियमांमध्ये शिथिलता देखील देण्यात आली आहे. बॅंकेचे देखील व्यवहार शक्यतो ऑनलाईन करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा -

उद्योगपती अनिल अंबानीचे कार्यालय येस बँकेकडून सील

एसबीआयमध्ये सर्कल बेस ऑफिसर पदासाठी भरती
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement