सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण! तपास सीबीआयला द्यावा बिहार सरकारने केंद्र सरकारला लिहिले पत्र

मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत या प्रकरणाता तपास सीबीआयला देण्यात यावा अशी मागणी, नितीश कुमार यांनी केल्याची माहिती बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण! तपास सीबीआयला द्यावा बिहार सरकारने केंद्र सरकारला लिहिले पत्र
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. तसेच तपास अधिकाऱ्यांना जबरदस्ती क्वारनटाईन करण्यात आल्याने नाराज झालेल्या बिहारच्या पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या घटनेची माहिती दिली. नितीश कुमार यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या या दुट्टपी भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत थेट केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत या प्रकरणाता तपास सीबीआयला देण्यात यावा असे नमूद केले असल्याची  माहिती स्वतः गुप्तेश्वर पांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.  

बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे. बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळणे अपेक्षित आहे. मात्र ते तसे न करताना दिसत नाहीत. याबाबत मी स्वतः महाराष्ट्र पोलिस महासंचालक सुबोध कुमार जैयस्वाल आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांना फोन करून तसेच मेसेज करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही. मुंबई पोलिस सुशांत आत्महत्या प्रकरणाचे कोणतेही कागदपत्र देत नाही आहेत. तसेच ज्या ठिकाणी बिहार पोलिस तपासाला जात आहेत. त्यांच्या तपासात अडथळे निर्माण करत आहेत. मुंबई पोलिस तर सध्या रिया चक्रवर्तीची भाषा बोलत आहेत. तिलाही बिहार पोलिस करत असलेला तपास नको आहे. या प्रकरणाचा तपास योग्य रित्या व्हावा ही आमची मानसिकता आहे. मग तो बिहार पोलिसांनी करावा. किंवा सीबीआयने मात्र तेही त्यांना मान्य नाही. मुंबईत बिहार पोलिसांना एका आरोपीप्रमाणे मुंबईचे पोलिस गाडीत बसवून नेत आहेत. एका आयपीएस अधिकाऱ्याला काल मिळालेली वागणूक संबध भारताने प्रसार माध्यमांद्वारे पाहिली आहे. त्यांना ज्या प्रकारे रात्री ११ वा. जबरदस्ती क्वारनटाईन करण्यात आले. त्यावरून सुशांत आत्महत्या प्रकरणात तपासापासून बिहार पोलिसांना लांब ठेवण्यासाठी जाणून बुजून अडथळा निर्माण केला जात असल्याचे स्पष्ठ दिसत असल्याचा आऱोप बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे.

हेही वाचाः-मुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू

बिहार पोलिसांना मुंबईत मिळत असलेल्या वागणूकीमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत, नितीश कुमार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहीत या प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्याबाबतची मागणी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारनेही सीबीआयला तपास देण्यावर आक्षेप घेत न्यायालयात याबाबत दाद मागणार असल्याचे कळते. मुंबई पोलिसांच्या मते,  बिहार पोलीस  कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन चौकशी करत आहेत. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. बिहार पोलिसांना एफआयआरची नोंद करायला हवी होती. आम्हाला माहिती नाही कुठल्या कायद्यांतर्गत बिहार पोलीस एक्स्ट्रा टेरिटोरियल तपास करत आहेत. ज्याप्रकारे कायदेशीर सल्ला मिळेल त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करु. त्यामुळे आम्ही अजून कुठलेही कागदपत्रे बिहार पोलिसांना दिलेले नाहीत. अजूनही तपासाचे सर्व अधिकार स्थानिक पोलिसांनाच आहेत. त्यांनी आम्हाला केस ट्रान्सफर करायला हवी होती. मात्र आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे.

हेही वाचाः- सुशांत सिंहच्या वडिलांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा