Advertisement

मुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू

तर मंगळवारी दिवसभरात ८७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९० हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत ७०९ नवे रुग्ण, दिवसभरात ५६ जणांचा कोरोनाने मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मंगळवारी कोरोने ३०० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. असे असताना मुंबईत मात्र काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचे पहायला मिळते. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ७०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः-दिलासादायक! बोरिवलीत कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावला

 राज्यात कोरोनाच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ टक्क्यांवर मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५६ रुग्ण दगावले आहेत. तर २ आँगस्ट रोजी ४६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी ३ आँगस्ट रोजी एकूण ४९ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ७०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख १८ हजार १३० इतकी झाली आहे. तर मंगळवारी दिवसभरात ८७३ जणांनी कोरोनावर मात केली असून कोरोनाची लागण झालेल्या एकूण ९० हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः-मी बाळासाहेबांचा नातू! सुशांत सिंह प्रकरावरून आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नविन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नविन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.


आज निदान झालेले ७७६० नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४), रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७), सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१), अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.

Read this story in English
संबंधित विषय