Advertisement

दिलासादायक! बोरिवलीत कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावला

बोरिवली या भागात सुरुवातीला कोरोना रुग्णांचा आकडा अधिक होता. पण आता परिस्थिती बदलत आहे.

दिलासादायक! बोरिवलीत कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग मंदावला
SHARES

बोरिवली या भागात सुरुवातीला कोरोना रुग्णांचा आकडा अधिक होता. पण आता परिस्थिती बदलत आहे. या भागात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. २ ऑगस्टपर्यंत पालिकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बोरिवलीत सध्या ४६ दिवसात कोरोना रुग्णाचा आकडा दुप्पट व्हायचा. आधी ३२ दिवसात आकडा दुप्पट होत होता. ऑगस्टपर्यंत बोरिवलीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५ हजार ६०९ इतकी आहे.

बोरिवलीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाण अधिक होतं. त्यामुळे पालिकेनं बोरिवली भागात अनेक योजना आखल्या. घरा-घरात जाऊन लोकांची स्क्रिनिंग चालू केली. मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं. याशिवाय हेल्मेट स्क्रिनिंगचा वापर केला.

१५-२० दिवसांपूर्वी बोरिवलीत २८ दिवसांनी कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. त्यानंतर ३२ दिवसांवर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होऊ लागली. पण आता कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्यास ४६ दिवस लागत आहेत. त्यामुळे नक्कीच पालिकेसोबतच बोरिवलीकरांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.



हेही वाचा

दहिसर ते गोरेगाव भागातील बहुतांश नागरिक घालत नाहीत मास्क

मुंबईतील ७० टक्के कोव्हि़ड सेंटर बंद

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा