Advertisement

दहिसर ते गोरेगाव भागातील बहुतांश नागरिक घालत नाहीत मास्क

दहिसर ते गोरेगाव भागातील बहुतांश नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत.

दहिसर ते गोरेगाव भागातील बहुतांश नागरिक घालत नाहीत मास्क
SHARES

मुंबई पश्चिमेकडील उपनगरात गोरेगावपासून ते दहिसरपर्यंत कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. या भागांमध्ये रोज कोरोना रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे पालिकेनं या भागात अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे.   दहिसर ते गोरेगाव भागात पालिकेच्या नियमांचं काटेकोर पालन होतं की नाही याकडे पालिका लक्ष ठेवून आहे.

पालिका नियम पाळण्यास सक्ती करते. जर नियम पाळत नसतील तर त्यांच्याकडून दंड वसूली देखील केली जाते. पण तरीही दहिसर ते गोरेगाव भागातील बहुतांश नागरिक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. पालिकेच्या नियमानुसार घरातून बाहेर पडताना मास्क बंधनकारक आहे. पण कित्येक जण मास्क घालत नसल्याचं आढळलं आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २० हजारांचा टप्पा

मास्क न घातलेली सर्वात जास्त प्रकरणं गोरेगावमध्येच समोर आली आहेत. त्यामुळे या परिसरात दहशतीचं वातावरण आहे. नवभारत टाईम्स मध्ये दिलेल्या बातमीनुसार, ५ हजार ४७७ नागरिकांच्या विरोधात मास्क न घातल्ययाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी सर्वात जास्त म्हणजे १ हजार ५१२ प्रकरणं ही दहिसर ते गोरेगाव दरम्यानची आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची संख्या चार लाखांवर गेली आहे. सोमवारी एका दिवसात ८ हजार ९६८ नवे रुग्ण समोर आले आहेत. तर २४ तासात २६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ४ लाख, ५० हजार १९६ रुग्ण सापडली आहेत. त्यापैकी २ लाख ८७, ०३० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ६३.७६ टक्के इतका आहे.हेही वाचा

गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार

मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय