Advertisement

गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार

लाॅकडाऊनच्या नियमांतर्गत गर्दी टाळण्यासाठी सम-विषम तत्वानुसार सुरू असलेली मुंबईतील दुकाने आता सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत आठवड्यातील सातही दिवस उघडता येणार आहेत.

गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार
SHARES

लाॅकडाऊनच्या नियमांतर्गत गर्दी टाळण्यासाठी सम-विषम तत्वानुसार सुरू असलेली मुंबईतील दुकाने आता सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत आठवड्यातील सातही दिवस उघडता येणार आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी काढलेल्या परिपत्रकात मुंबईत ५ ऑगस्टपासून रस्त्यांच्या दोन्ही बाजूची सर्व दुकानं सरसकट सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर दारूची विक्री करणाऱ्या दुकानांना काउंटर विक्री करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. (bmc cancels odd even formula for shops in mumbai during lockdown)

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथिल करताना काही नियम व अटींसह मुंबईतील दुकाने पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली होती. सम व विषम या तत्वावर एका वेळी रस्त्याच्या केवळ एका बाजूचीच दुकाने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र मुंबई महापालिकेने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार येत्या ५ ऑगस्टपासून मुंबईतली सर्व दुकाने ही सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली राहणार आहेत. यामध्ये मद्य विक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. याबाबत मार्गदर्शक नियमावली जारी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्रात लॉकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवला; नव्या आदेशात पाहा काय सुरु-काय बंद

तब्बल ४ महिन्यांपासून बंद असलेले माॅल्स आणि शाॅपिंग काॅम्प्लेक्स देखील ५ आॅगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू होणार आहेत. माॅलमधील थिएटर्स, फूड कोर्ट, रेस्तराँ, हॉटेल्स मात्र बंद राहणार असून त्यांना केवळ होम डिलिव्हरीची संमती देण्यात आली आहे.

नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. मद्याची देखील होम डिलिव्हरी करता येणार आहे. काही अटींवर जीम सुरू करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. कोणत्याही नियमाचा भंग केला तर कारवाई केली जाणार आहे.    

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा