Advertisement

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २० हजारांचा टप्पा

कल्याण-डोंबिवली महापालिका ( KDMC) क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नुकताच २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २० हजारांचा टप्पा
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका ( KDMC) क्षेत्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने नुकताच २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवार १ आॅगस्ट रोजी ३०३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्यानंतर येथील रुग्णसंख्या २० हजारांच्या (२०,२७०) पलिकडे गेली. 

कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिकेने सोबतच १५ हजार कोरोनाबाधित रुग्णांचा टप्पा ओलांडला होता. परंतु केडीएमसी मुंबई महापालिकेपाठोपाठ २० हजार कोरोना रुग्णांचा टप्पा पार करणारी मुंबई महानगर क्षेत्रातील दुसरी महापालिका ठरली आहे. सद्यस्थितीत केडीएमसी परिसरात ठाण्याच्या तुलनेत अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार २ आॅगस्ट २०२० रोजी कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात डिस्चार्ज झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १४,६९४ इतकी असून ५५६२ कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ३७७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - दिलासादायक! मुंबईतील कंटेन्मेंट झोन्स २२ टक्क्यांनी घटले

या तुलनेत ठाणे महापालिका परिसरात डिस्चार्ज झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १४,४९७ इतकी असून ४११५ कोरोनाबाधित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ६३४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मागील काहील दिवसांमध्ये ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या देखील वाढतानाच दिसत आहे. मागील २ आठवड्यांमध्ये ठाण्यातील कोरोना हाॅटस्पाॅटची संख्या २७ वरुन ४० वर जाऊन पोहोचली आहे.  परिणामी ठाण्यात कडक लाॅकडाऊन पुढेही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ठाण्यातील रेड/कंटन्मेंट झोनमधील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आलं आहे. या लाॅकडाऊनच्या नियमानुसार ठाणे महापालिका परिसरातील सर्व माॅल, शाॅपिंग काॅम्प्लेक्स, जीम, स्विमिंग पूल बंदच ठेवण्यात येतील.

ठाण्यातील रेड/कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ आॅगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधांचं सर्व रहिवाशांनी पालन करणं अपेक्षित आहे, असं ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा (TMC commissioner vipin sharma) यांनी स्पष्ट केलं. 

हेही वाचा - मुंब्रा झाला ‘हाॅटस्पाॅट’मुक्त!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement