Advertisement

मुंब्रा झाला ‘हाॅटस्पाॅट’मुक्त!

कधी व्हायरल व्हिडिओ, तर कधी कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत असलेल्या मुंब्रा (Mumbra) परिसरात एकही कोरोना हाॅटस्पाॅट उरलेला नाही, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

मुंब्रा झाला ‘हाॅटस्पाॅट’मुक्त!
SHARES

कधी व्हायरल व्हिडिओ, तर कधी कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत असलेल्या मुंब्रा (Mumbra) परिसरात एकही कोरोना हाॅटस्पाॅट उरलेला नाही, हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु हे खरं आहे. अत्यंत कडक करण्यात आलेलं लाॅकडाऊन (Lockdown) आणि स्थानिक प्रशासनासोबत रहिवाशांनी पाळलेली शिस्त यामुळे येथील हाॅटस्पाॅट (Hotspot) कमी करण्यात यश आलेलं आहे.  

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचं संकट काही केल्या कमी होत नसल्याने येथील स्थानिक प्रशासनाने शहरातील लाॅकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुंब्य्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यावर रुग्णांवर इथंच उपचार करता यावेत या उद्देशाने महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात म्हाडाच्या माध्यमातून १ हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटा १०० खाटांच्या आयसीयू युनिटचा समावेश होता. कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा- मुंब्य्रात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय

सोबतच पोलिसांनी नाक्यानाक्यावर गस्ती पथक तैनात ठेवल्याने रहिवाशांच्या वावरावर नियंत्रण ठेवता आलं. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकांने बंद ठेवून गर्दीवर नियंत्रण मिळवता आलं. विवध उपाययोजनांद्वारे स्थानिक प्रशासनाने परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यावर भर दिल्याने हाॅटस्पाॅट कमी करण्यात यश आलं.

सद्यस्थितीत ठाण्यातील रेड/कंटन्मेंट झोनमधील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आलं आहे. या लाॅकडाऊनच्या नियमानुसार ठाणे महापालिका परिसरातील सर्व माॅल, शाॅपिंग काॅम्प्लेक्स, जीम, स्विमिंग पूल बंदच ठेवण्यात येतील. 

ठाण्यातील रेड/कंटेन्मेंट झोनमध्ये ३१ आॅगस्टपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्बंधांचं सर्व रहिवाशांनी पालन करणं अपेक्षित आहे, असं ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा (TMC commissioner vipin sharma) यांनी स्पष्ट केलं. 

नॉन कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांना मिशन बिगीन अगेननुसार सवलती मिळतील. ठाणे ग्रामीण, नगरपालिका आणि नगर पंचायत सीमे अंतर्गत येणाऱ्या भागात राज्य सरकारची नियमावली लागू असेल.

हेही वाचा- कळवा, मुंब्य्रात पूर्ण लाॅकडाऊन, ‘असे’ आहेत नवे नियम

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा