Advertisement

मुंब्य्रात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय

मुंब्रा येथील या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटा असतील. त्याचबरोबर १०० खाटांचं आयसीयू युनिटही तयार करण्यात येणार आहे.

मुंब्य्रात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय
SHARES

ठाणे महापालिका क्षेत्रात रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांसाठी खाटा कमी पडू नयेत म्हणून ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय मुंब्रा येथील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलातही म्हाडाच्या माध्यमातून 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारण्यात येणार आहे. 

ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथील कोरोना रुग्णालय लवकरच कार्यान्वित होणार आहे. तर भविष्यातील गरज लक्षात घेऊन मुंब्रा येथील महापालिकेच्या मौलाना अबुल कलाम आझाद क्रीडा संकुलात आणखी 1 हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या जागेची जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी नुकतीच पाहणी केली. 

मुंब्रा येथील या रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५०० खाटा असतील. त्याचबरोबर १०० खाटांचं आयसीयू युनिटही तयार करण्यात येणार आहे. मुंब्रा परिसरात निर्माण होणाऱ्या या रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांची मोठी सोय होणार असल्याचे पालकमंत्री शिंदे सांगितले. तर या रुग्णालयामुळे कळवा, मुंब्रा, कौसा आणि दिवा परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले.



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा