Advertisement

कळवा, मुंब्य्रात पूर्ण लाॅकडाऊन, ‘असे’ आहेत नवे नियम

लाॅकडाऊनच्या काळात कळवा प्रभाग समिती परिसरातील सर्व नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावं. लाॅकडाऊन काळात विनाकारण परिसरात फिरताना किंवा वाहनाचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कळवा, मुंब्य्रात पूर्ण लाॅकडाऊन, ‘असे’ आहेत नवे नियम
SHARES

ठाण्यातील कळवा, मुंब्रा परिसरात COVID-19 च्या रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने ३१ मे २०२० पर्यंत कळवा प्रभाग समितीमध्ये (complete lockdown in kalwa and mumbra area in thane district) संपूर्ण लाॅकडाऊन करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. 

कोरोनाबाधितांची वाढ

ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित (covid -19 patient) रुग्णांची संख्या ७७८१ वर गेली असून १४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी २२२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सद्यस्थितीत ५४०८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशा स्थितीत ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही परिसरांत पूर्ण लाॅकडाऊन ठेवण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहे. 

हेही वाचा - बीएमसीतील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची आकडेवारी प्रथमच जाहीर, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना लागण

कळव्यात दुकानांच्या वेळा

आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार कळवा प्रभाग समिती परिसरात २८ मे ते ३१ मे २०२० या कालावधीत संपूर्ण कळवा प्रभाग लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुढील ४ दिवस लाॅकडाऊनच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता (मेडिकल व दूध डेअरी (एक दिवसाआड)) सर्व दुकाने म्हणजेच किराणामाल, मटण-चिकन, मासे विक्रीसहीत इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. सदर लाॅकडाऊनचं पालन न करणाऱ्या दुकानदारांवर कळवा प्रभाग समिती, ठाणे महापालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल. 

तर, उथळसर परिसरात दूध डेअरी (पहाटे ५ ते सकाळी ९)आणि औषधांची दुकाने वगळत इतर सर्व सेवा बंद राहतील.

लाॅकडाऊनच्या काळात कळवा प्रभाग समिती परिसरातील सर्व नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावं. लाॅकडाऊन काळात विनाकारण परिसरात फिरताना किंवा वाहनाचा वापर करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

कडक कारवाई

याचप्रमाणे मुंब्रा परिसरात सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान केवळ दूध आणि औषधांची दुकानेच सुरू राहतील. तर भाजीपाला, किराणा सहित इतर सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद राहतील. मुंब्रा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून गर्दी करत होते. अन्नधान्य, भाजीपाला घेताना दुकानांत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत नव्हते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ठाणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंब्रा परिसरातील पोलिसांची गस्त देखील वाढवण्यात आली असून परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. हे नियम पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा