Advertisement

1 ते 2 तासांत रुग्णांना बेड उपलब्ध करणार, मुंबई महापालिकेचा दावा

मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे.

1 ते 2 तासांत रुग्णांना बेड उपलब्ध करणार, मुंबई महापालिकेचा दावा
SHARES

मुंबईत रुग्णालयांमध्ये रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता डॅशबोर्ड तयार केला आहे. रुग्णांनी आता थेट रुग्णालयांत न जाता १९१६ या क्रमांकावर कॉल करावा. तिथे डॅशबोर्डवर नोंद झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एक ते दोन तासांत बेड उपलब्ध करून दिले जात आहेत, असा दावा महापालिकेने केला आहे.

कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त बेड तयार केले जात असून त्यापैकी ५० टक्के बेड ऑक्सिजनचे असतील यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे.  लक्षणं नसलेल्या रुग्णांनी घरी वेगळी व्यवस्था असेल तर घरीच राहावे. त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

मुंबईत डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने आता महापालिकेने राज्याच्या ग्रीन झोनमधून डॉक्टर मागवण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. याशिवाय केरळमधून डॉक्टर आणि नर्स आणण्याचाही विचार राज्य सरकारने केला आहे. पालिकेनेडॉक्टरांची भरतीही सुरु केली आहे.


हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा