Advertisement

धारावी पॅटर्नची वॉशिंग्टन पोस्टकडून दखल, पालिकेचं केलं कौतुक

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या धारावी पॅटर्नची दखल आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनंही घेतली आहे.

धारावी पॅटर्नची वॉशिंग्टन पोस्टकडून दखल, पालिकेचं केलं कौतुक
SHARES

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या धारावी पॅटर्नची दखल आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टनंही घेतली आहे. वॉशिंग्टन पोस्टने मुंबई महापालिकेचं यासाठी कौतुकही केलं आहे. 

याआधी मुंबई महानगरपालिकेने धारावीसह मुंबईतील कोरोना नियंत्रणासाठी उभारलेल्या लढ्याचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं होतं. यानंतर आता अमेरिकेतील अग्रगण्य वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने देखील या कामाची दखल घेत गौरव केला. ३१ जुलैला वॉशिंग्टन पोस्टमध्ये धारावी पॅटर्नवर आधारित ‘How a packed slum in Mumbai beat back the coronavirus, as India’s cases continue to soar’ हा लेख प्रकाशित झाला होता. धारावीसारख्या दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात कोरोनावर नियंत्रण मिळवला आहे. इतर देशांसाठीही हा महत्त्वाचा धडा असल्याचं या लेखात म्हटलं आहे. 

डोक्यावर कोरोना संकट असताना धारावीने केलेले उपाय, समुदायाचा सहभाग आणि चिकाटी ही दखलपात्र आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यूंची आकडेवारीबाबत पालिकेचं काम परिणामकारक आहे. धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीत करोनाचा प्रसार रोखण्यास पालिकेला यश मिळालं असल्याचं कौतुकही या लेखात केलं आहे.

मुंबई महापालिकेचं आयुक्त इक्बाल चहल यांनीही धारावीकरांची व धारावीत अहोरात्र सेवा देणाऱ्या करोना योद्ध्यांची पाठ थोपटली आहे.  धारावीमध्ये १ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला होता. धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला होता. धारावीत आता फक्त ७२ अॅक्टिव्ह रुग्ण असून २२३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. धारावीमधील ८५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.



हेही वाचा -

 सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा  मुंबईत कोरोनाचे

जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा