Advertisement

मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे

गेल्या काही दिवसांत धारावीसह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये रुग्णवाढीचा सरासरी वेग १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे.

मुंबईत जुलैमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे
SHARES

मुंबईत जुलै महिन्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जुलैमध्ये मुंबईत ४९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना नियंत्रणात आल्याने आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने पालिकेने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे. 

मुंबईत १ जुलै रोजी  ७८ हजार ७०८ करोना रुग्ण होते. यापैकी ४४ हजार ७९१ रुग्ण बरे झाले आहेत. जुलैमध्ये २९ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण होते. ३१ जुलैपर्यंत करोना रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २७८ झाली आहे. तर कोरोनाने बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ८७ हजार ७४ वर गेली आहे. त्यामुळे जुलैमध्ये एकूण ४२२८३ रुग्ण बरे झाले आहेत.

 मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ४२ दिवसांवरून ७७ दिवसांवर गेला आहे.   जुलैमध्ये कोरोनाचे ३५ हजार ५७० नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांत धारावीसह मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा विचार करता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये रुग्णवाढीचा सरासरी वेग १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे.

जुलै महिन्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.  पालिकेच्या आकडेवारीनुसार १ जुलैमध्ये मुंबईत २९ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण होते. ३१ जुलैपर्यंत ही संख्या ८७१९ ने कमी होऊन २० हजार ५६९ एवढी झाली. मात्र जुलै महिन्यातील मृत्यूदर  अधिक होता. १ जुलैपर्यंत मुंबईत करोनामुळे ४ हजार ६२९ रुग्णांचा मृत्यू झाला.  तर ३१ जुलैपर्यंत १ हजार ७२१ रुग्ण दगावले होते. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत मृतांची संख्या ६३५० वर गेली.  

सर्वाधिक मृत्यू अंधेरी पूर्व येथे नोंदवले गेले. अंधेरी पूर्व येथे ४५५, धाराववीत ४३९ आणि कुर्ला, साकीनाका वॉर्डात ४०६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाचा हॉटस्पॉट राहिलेल्या धारावीत आता फक्त ७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २२३५ रुग्ण बरे झाले आहेत. हेही वाचा -

 सुशांत सिंह आत्महत्येच्या प्रकरणी ‘कूक’ने केला मोठा खुलासा  मुंबईत कोरोनाचे

जास्त बील आकारल्याने माहीममधील रुग्णालयाची नोंदणी रद्द
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement