Advertisement

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री

मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं आपलं काम करत आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच- गृहमंत्री
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास अजूनही मुंबई पोलिसांकडेच आहे. एवढंच नाही, तर मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं आपलं काम करत आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच सरकारची यापुढची भूमिका काय असेल हे ठरवण्यात येईल, असंही देशमुख यांनी सांगितलं. (mumbai police investigating the sushant singh rajput suicide case very professionally says maharashtra home minister anil deshmukh)

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)कडे सोपवला का? की मुंबई पोलीस या प्रकरणाचा समांतर तपास करणार आहेत? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला. 

त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले की, केंद्र सरकारने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत सीबीआयकडे तपास सोपवत असल्याचं न्यायालयात सांगितलं असलं, तरी अजूनही राज्य सरकारने हा तपास सीबीआयकडे सोपवलेला नाही. मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं आपलं काम करत आहेत. सुशांत सिंह प्रकरणात येत्या ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय देतं, यावर महाराष्ट्र सरकार आपली पुढील दिशा ठरवणार आहे.

हेही वाचा- आता महाराष्ट्र सरकार सीबीआयलासुद्धा क्वाॅरंटाईन करणार का? भाजपचा सवाल

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप सातत्याने भाजपकडून करण्यात येत आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यासाठीच राजकीय दबावतंत्राचा वापर केला जात आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नसताना भाजपकडून राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू असल्याचंही अनिल देशमुख म्हणाले.

दरम्यान, बिहारच्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने याबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि या प्रकरणाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारने ही माहिती न्यायालयात दिली. 

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतचे वडील के.के सिंह यांनी बिहारमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले होते. बिहार पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत बरीच माहिती मिळवली. त्यात सुशांतच्या बँकेचे डिटेल्स खूप महत्वाचे ठरले. त्या बँक डिटेल्सच्या आधारे सुशांतच्या खात्यातून रियाच्या बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराद्वारे रियावर पोलिसांचा संशय बळावला. रियाच्या चौकशीसाठी बिहार पोलीस तिच्या घरी देखील गेले. मात्र ती घरात नव्हती.

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी बिहार सरकारने पोलीस अधिक्षकांना मुंबईत पाठवलं. पण ते मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि वादची ठिणगी पडली. या दरम्यान रियाने सुप्रीम कोर्टात याचिका करत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा अशी याचिका केली होती.

हेही वाचा- सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने-अनिल देशमुख

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा