Advertisement

आता महाराष्ट्र सरकार सीबीआयलासुद्धा क्वाॅरंटाईन करणार का? भाजपचा सवाल

महाराष्ट्र सरकार आता सीबीआयला देखील क्वारंटाईन करणार का? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

आता महाराष्ट्र सरकार सीबीआयलासुद्धा क्वाॅरंटाईन करणार का? भाजपचा सवाल
SHARES

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलीस अधिकाऱ्यांना ज्या प्रकारे क्वारंटाईन करण्यात आलं, त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकार आता सीबीआयला देखील क्वारंटाईन करणार का? असा प्रश्न भाजप आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकार झोपली आहे का? असंही कदम यांनी विचारलं आहे. (bjp mla ram kadam reaction on cbi inquiry of sushant singh rajput suicide case)

बिहारच्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आल्यानंतर बिहार सरकारने याबाबत नाराजी व्यक्त करत, केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि या प्रकरणाताचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी केली होती. रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारने ही माहिती न्यायालयात दिली. 

हेही वाचा - सुशांतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे, उच्च न्यायालयाने सरकारचे कान उपटले

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतचे वडील के.के सिंह यांनी बिहारमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर बिहार पोलिस तपासासाठी मुंबईत आले होते. बिहार पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत बरीच माहिती मिळवली. त्यात सुशांतच्या बँकेचे डिटेल्स खूप महत्वाचे ठरले. त्या बँक डिटेल्सच्या आधारे सुशांतच्या खात्यातून रियाच्या बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराद्वारे रियावर पोलिसांचा संशय बळावला. रियाच्या चौकशीसाठी बिहार पोलीस तिच्या घरी देखील गेले. मात्र ती घरात नव्हती.

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी बिहार सरकारने पोलीस अधिक्षकांना मुंबईत पाठवलं. पण ते मुंबईत आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि वादची ठिणगी पडली. या दरम्यान रियाने सुप्रीम कोर्टात याचिका करत या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच ठेवावा अशी याचिका केली होती.

त्यावेळी केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्र सरकारनं बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआ करणार असल्याचं स्पष्ट केलं. सुशांत सिंह यांच्या वडिलांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले आहेत. त्यात बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी कायम ठेवण्याचीही कोर्टाकडे परवानगी मागितली आहे. कोर्टानं दोन्ही पक्षांचं म्हणनं नोंदवून घेतलं आहे. याप्रकरणी आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण : बिहार IPS विनय तिवारींना मुंबई सोडण्याची परवानगी

संबंधित विषय
Advertisement