सुशांत आत्महत्या प्रकरण : बिहार IPS विनय तिवारींना मुंबई सोडण्याची परवानगी

पालिकेच्या परवानगीनुसार, शुक्रवारी ते पाटनासाठी रवाना होतील.

सुशांत आत्महत्या प्रकरण : बिहार IPS विनय तिवारींना मुंबई सोडण्याची परवानगी
SHARES

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी बिहारहून मुंबईला आलेले आयपीएस विनय तिवारी यांना पालिकेनं क्वारंटाईन केलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना मंबईतून बिहारला जाण्यास पालिकेनं परवानगी दिली आहे.

पालिकेच्या परवानगीनुसार, शुक्रवारी ते पाटनासाठी रवाना होतील. विनय तिवारी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईहून पाटण्याकडे रवाना होतील. पालिकेनं मेसेज द्वारे विनय तिवारी यांना त्यांचा संपुष्टात आल्याची माहिती दिली. त्याचसोबत पालिकेनं या आदेशाची एक प्रत बिहार पोलिस मुख्यालयात पाठवली आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना बिहार सरकारनं तपास आपल्याकडे वर्ग करावा अशी मागणी लावून धरली. एवढंच नाहीतर बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे मुंबईत २ ऑगस्ट रोजी दाखल झाले होते. मुंबईत आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं.

हेही वाचा : सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने सामने

लॉकडाउन नियमावलीनुसार, सात दिवसात एखाद्या अत्याआवश्यक कामासाठी आलेली व्यक्तीला मुळगावी जाता येते. पण सात दिवसाचा आत जर गेले नाही तर मात्र, त्या व्यक्तीस चाचणी करणे तसंच पुढील सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. या नियमांमुळे आणि बिहार पोलिसांनी केलेल्या विनंती अर्ज विचार करून पालिकेनं तिवारी यांना जाण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागानं (CBI) गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली CBIनं एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रिया चक्रवर्ती, तिचे वडील-आई, भाऊ शोविक चक्रवर्ती, मित्र सॅन्मुयल मिरांडा, श्रुती मोदीसह एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा

सुशांतच्या आत्महत्येचा तपास ‘सीबीआय’कडे

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, ईडीकडून रियाला चौकशीसाठी समन्स

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा